शिवसेनेच्या मतदार संघांत भाजपाची मोर्चेबांधणी, दानवे यांच्या दौ-यात व्यूहरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 05:33 AM2017-12-09T05:33:08+5:302017-12-09T05:33:24+5:30

कालच्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा-शिवसेना एकत्र आल्याचे वरवर दिसत असले तरी प्रत्यक्षात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी अलिकडे घेतलेल्या विभागीय

Strategy during the visit of BJP to the Shiv Sena's Constituent Assembly, Danwe | शिवसेनेच्या मतदार संघांत भाजपाची मोर्चेबांधणी, दानवे यांच्या दौ-यात व्यूहरचना

शिवसेनेच्या मतदार संघांत भाजपाची मोर्चेबांधणी, दानवे यांच्या दौ-यात व्यूहरचना

Next

मुंबई : कालच्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा-शिवसेना एकत्र आल्याचे वरवर दिसत असले तरी प्रत्यक्षात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी अलिकडे घेतलेल्या विभागीय बैठकांमधून शिवसेनेच्या ताब्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदार संघांवर भाजपाने विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.
खा. दानवे यांनी राज्याच्या चारही विभागात जाऊन खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, महापौर, नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्यांपासूनचे लोकप्रतिनिधी आणि विस्तारकांंच्या बैठकी नुकत्याच घेतल्या.
भाजपाने राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये सहा महिन्यांसाठी विस्तारक नेमले आहेत. त्या सगळ्यांची मुदत आता तीन महिने वाढवून देण्यात येणार आहे. त्यांच्यावर बुथरचनेची जबाबदारी देण्यात आली आहे. सोपविण्यात आलेली ही जबाबदारी पूर्ण झाल्यानंतर ‘वन पेज, वन युथ’ ही संकल्पना राबविली जाणार आहे.
मतदार यादीच्या एका पेजवरील मतदारांची जबाबदारी एका कार्यकर्त्याकडे दिली जाईल. त्या पेजवर ज्या जातीचे मतदार अधिक आहेत त्या जातीच्या कार्यकर्त्याला जबाबदारी देण्यावर अधिक भर असेल. इतके सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे.
खा. दानवे यांनी लोकमतला सांगितले की, लोकसभा, विधानसभेपासून ते थेट ग्रामपंचायतीपर्यंतच्या निवडणुकांत भाजपाला मोठे यश मिळाल्यानंतर मित्र पक्षाचे मतदारसंघ वगळून व्यूहरचना करणे शक्य नव्हते. आम्हाला संपूर्ण राज्याचा विचार करूनच नियोजन करणे आवश्यक आहे. लवकरच मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे दौरे करू, असेही ते म्हणाले.

Web Title: Strategy during the visit of BJP to the Shiv Sena's Constituent Assembly, Danwe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.