लवकरच मुंबईत २६ नवीन अग्निशमन केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 04:11 AM2019-01-03T04:11:47+5:302019-01-03T04:11:54+5:30

आगीच्या घटना मुंबईत वाढल्यामुळे सर्वत्र टिकास्त्र उठले आहे. या चौकशीत मुंबई अग्निशमन दलाची यंत्रणा तोकडी असल्याचेही समोर आले. यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने अग्निशमन यंत्रणेला बळकट करण्याची तयारी सुरू केली आहे.

 Soon, 26 New Fire Centers in Mumbai | लवकरच मुंबईत २६ नवीन अग्निशमन केंद्रे

लवकरच मुंबईत २६ नवीन अग्निशमन केंद्रे

googlenewsNext

मुंबई : आगीच्या घटना मुंबईत वाढल्यामुळे सर्वत्र टिकास्त्र उठले आहे. या चौकशीत मुंबई अग्निशमन दलाची यंत्रणा तोकडी असल्याचेही समोर आले. यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने अग्निशमन यंत्रणेला बळकट करण्याची तयारी सुरू केली आहे.
या अंतर्गत उत्तुंग इमारतींमध्ये लागणारी आग विझवण्यासाठी ९० मीटर उंच शिडी, आगीवर नियंत्रण मिळवणारा रोबो, नवीन पदांची भरती तसेच मुंबईत आणखी २६ नवीन अग्निशमन केंद्रे सुरू करणार असल्याचे स्थायी समितीमध्ये आज जाहीर केले.
अग्निशमन दलात सुमारे नऊशे पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर आगीवर नियंत्रण मिळवणे आणि कार्यालयीन कामं एकाच विभागामार्फत केली जात असल्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण जवानांवर येत आहे. यावर सर्वपक्षीय सदस्यांनी धारेव? धरताच प्रशासनाने अग्निशमन दलातील नवीन बदलांची माहिती स्थायी समितीला दिली. मुंबईत २६ नवीन केंद्रे सुरू करण्यासाठी भूखंड मिळण्याकरिता विकास आराखडा ‘२०१४-२०१४’मध्ये कार्यवाही सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.

1) २०१५ ते २०१८ या कालावधीत ५६५८ इमारतींची तपासणी करण्यात आली असून ३०१८ इमारतींना अग्निशमन यंत्रणा नसल्याबद्दल नोटीस देण्यात आली. उपहारगृहांवरील कारवाईत १७९२ प्रकरणांत कारवाई करण्यात आली.
2) अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या अत्याधुनिकरणासाठी इंटिग्रेटेड कंट्रोल अ?ॅण्ड कमांड प्रणाली. दाटीवाटीच्या ठिकाणी मदतकार्य करण्यासाठी १७ जलद प्रतिसाद वाहने.
3) स्वतंत्र अग्निसुरक्षा पालन कक्षासाठी २४ विभागांत कार्यवाही अंतिम टप्प्यात. आग नियंत्रण आणि कार्यालयीन कामांसाठी स्वतंत्र विभाग.

Web Title:  Soon, 26 New Fire Centers in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई