पाच हजार इमारतींवर सौर पॅनल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 04:22 AM2019-06-19T04:22:40+5:302019-06-19T04:22:58+5:30

ईईएसएलकडून चाचपणी; ३२५ कोटींची करणार गुंतवणूक

Solar panels on five thousand buildings | पाच हजार इमारतींवर सौर पॅनल

पाच हजार इमारतींवर सौर पॅनल

googlenewsNext

मुंबई : पाच हजार इमारतींवर सौर पॅनल बसविण्यात ईईएसएलकडून चाचपणी करण्यात आली. यासंदर्भात एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने (ईईएसएल) सोमवारी केएफडब्ल्यू व इदम इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅडव्हायजरी प्रा. लि. या कंपनीच्या (इदम इन्फ्रा.) सहकार्याने सर्व भागधारकांसाठी सोमवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाराष्ट्र सरकारमधील महत्त्वाच्या विभागांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना येत्या दोन ते तीन वर्षांत राज्यभरातील पाच हजार इमारतींवर बसविण्यात येणाºया, ग्रीडशी जोडल्या जाणाºया सौर प्रकल्पासंदर्भात माहिती देण्यात आली.

महाराष्ट्रातील सरकारी इमारतींमध्ये ईईएसएलने यापूर्वीच ऊर्जेचा किफायतशीर वापर करणारी उपकरणे बसविण्याचा कार्यक्रम हाती घेतला असून, ३२५ कोटी रुपयांच्या या गुंतवणुकीमुळे वर्षाला ३९ टक्क्यांपर्यंत वीजबचत करता येणार आहे. सौर पॅनेल बसविण्यात येणाºया इमारतींना पुढील २५ वर्षे लेव्हलाइज्ड दर आकारणीच्या माध्यमातून स्वस्तात वीज उपलब्ध होणार असून, या इमारतींना त्यांच्या संपूर्ण आयुर्मानाच्या काळात लागणाºया विजेचा खर्च आणखी लक्षणीयरीत्या कमी होऊ शकणार आहे.
महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, ईईएसएलचे चेअरमन राजीव शर्मा, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार आणि ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

उपायांचे बळकटीकरण
चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारतातील विजेच्या एकूण वापरापैकी सुमारे ३२ टक्के वापर हा निवासी आणि वाणिज्य इमारतींच्या माध्यमातून होतो. भारतात ज्याप्रमाणे शहरीकरण होत आहे, ते पाहाता हा आकडा आणखी वाढू शकतो. राज्य सरकारने त्यांच्या इमारतींना लागणाºया विजेचे प्रभावी नियमन करण्यासाठी यापूर्वीच अनेक प्रशंसनीय उपाय राबविले आहेत. त्यांना आणखी बळकटी आणणाºया नवीन संधींचा शोध घेऊन राज्याच्या पर्यावरणस्नेही उपक्रमांना हातभार लावण्यात येणार आहे.

Web Title: Solar panels on five thousand buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.