कोस्टल रोड प्रकल्पाला शिवसेनेचा रेड सिग्नल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 02:37 AM2018-04-20T02:37:37+5:302018-04-20T02:37:37+5:30

मुंबईतील वाहतूक कोंडीवर मात्रा म्हणून सागरी मार्ग म्हणजेच कोस्टल रोडची संकल्पना पालिकेने मांडली. हा शिवसेनेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने यास झटपट मंजुरी मिळत होती.

Shiv Sena's red signal to coastal road project | कोस्टल रोड प्रकल्पाला शिवसेनेचा रेड सिग्नल

कोस्टल रोड प्रकल्पाला शिवसेनेचा रेड सिग्नल

Next

मुंबई : शिवसेनेने आपल्याच कोस्टल रोड या महत्वाकांक्षी प्रकल्पाला रेड सिग्नल देत सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत फेटाळला. नरिमन पॉईंट ते कांदिवली असा २९ किलोमीटर असा हा सागरी मार्ग तयार होत आहे. मात्र या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव गेले महिनाभर स्थायी समितीच्या बैठकीत रखडला होता. अखेर पालिका अधिनियमानुसार हा प्रस्ताव मंजूर झाला असल्याचा पालिका प्रशासनाचा दावा आहे. यामुळे प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेत संघर्ष निर्माण झाला आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडीवर मात्रा म्हणून सागरी मार्ग म्हणजेच कोस्टल रोडची संकल्पना पालिकेने मांडली. हा शिवसेनेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने यास झटपट मंजुरी मिळत होती. शिवसेनेने महापालिका निवडणुकीत आपल्या वाचननाम्यात कोस्टल रोडचे आश्वासन दिले होते. त्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू झाली असून या कामावर देखरेख ठेवण्यासाठी लुइस बर्जर कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड, इजेस इंडिया कॅन्सल्टिंग आणि कलिन ग्रूमिंग आणि रो या सल्लागार कंपनीची निवड केली आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मार्च महिन्याच्या बैठकीत पाठविण्यात आला होता.
पालिका अधिनियम ६९ अनुसार स्थायी समितीच्या पटलावर प्रस्ताव मांडल्यानंतर महिन्याभरात निर्णय होण्याची गरज असते. ही मुदत १३ एप्रिलपर्यंत होती. त्यामुळे प्रस्ताव स्थायीची पूर्वमान्यता गृहीत धरून मंजूर झाला. यामुळे शिवसेनेत नाराजी असून स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा मंजूर झालेला प्रस्ताव पुन्हा पटलावर घेऊन रद्द केला आहे. यामुळे शिवसेना विरूद्ध प्रशासन असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
कोट्यवधीचा सल्ला
प्रकल्पाचा आराखडा तयार करणे, रेखाचित्रे,कामावर देखरेख अशा विविध कामांसाठी तीन प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांची नेमणूक होईल. प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पैलेसपर्यंतच्या काम मे. लुइस बर्जर कन्सल्टन्सी कंपनी लि. ५० कोटी ५२ लाख ८० हजार शुल्क देण्यात येईल. तर बडोदा पॅलेस ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दक्षिणेकडील टोकापर्यंतचे कामाचा मोबदला ५७ कोटी ६१ लाख ६० हजार रुपये देण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडी फुटणार
या प्रकल्पासाठी गिरगाव चौपाटी येथे भूमिगत बोगदा बांधण्यात येत आहे. चौपटी येथून निघालेला हा बोगदाप्रियदर्शनी पार्कजवळ बाहेर पडेल. प्रकल्पासाठी आठ हजार कोटी खर्च येईल.

नरिमन पॉईंट ते कांदिवली - २९.२ कि.मी. सागरी मार्ग
पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे सी लिंक पर्यंत या ९.९८ किमीचे काम २0१९ पर्यंत करण्यात येणार आहे.
त्यानंतर वांद्रे सी लिंक ते कांदिवली या दुसऱ्या टप्प्याचे काम करण्यात येणार.
किनारपट्टीवर भराव टाकून, पूल आणि बोगद्यांचं बांधकाम करुन कोस्टल रोडची बांधणी केली जाणार आहे.
या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यासाठी ५३०३.३४ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. कोस्टल रोडवर रूग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहे

Web Title: Shiv Sena's red signal to coastal road project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई