अंगणवाडी कर्मचा-यांच्या संपाला शिवसेनेचा पाठिंबा!, आजपासून उग्र आंदोलने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 04:49 AM2017-09-21T04:49:06+5:302017-09-21T04:49:09+5:30

गेल्या ९ दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांच्या संपाला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पाठिंबा दिला आहे.

Shiv Sena support for the movement of Anganwadi workers | अंगणवाडी कर्मचा-यांच्या संपाला शिवसेनेचा पाठिंबा!, आजपासून उग्र आंदोलने

अंगणवाडी कर्मचा-यांच्या संपाला शिवसेनेचा पाठिंबा!, आजपासून उग्र आंदोलने

Next

मुंबई : गेल्या ९ दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांच्या संपाला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पाठिंबा दिला आहे.
संपाच्या चर्चेवरून मंगळवारी सरकारने घूमजाव केल्यामुळे, अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने बुधवारी शिवसेना भवन येथे ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी अंगणवाडी कृती समितीचे प्रतिनिधी एम. ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, आदी उपस्थित होते. या आधी सरकारसोबत चर्चा करताना, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हिरमोड झाल्यामुळेच, हे आंदोलन पुकारल्याचे अंगणवाडी कर्मचारी नेत्या शुभा शमीम यांनी सांगितले.
ठाकरे यांनी २७ सप्टेंबर रोजी होणाºया सभेस संबोधित करण्याचे आश्वासन दिल्याचे अंगणवाडी कर्मचाºयांचे नेते दिलीप उटाणे म्हणाले. त्यामुळे भाजपाविरोधात बाण चालविण्यासाठी शिवसेनेला अंगणवाडी कर्मचाºयांचे धनुष्य मिळाल्याची चर्चा सुरू आहे.
मानधनवाढीबाबत समाधानकारक तोडगा निघेपर्यंत, संप मागे घेतला जाणार नसल्याची भूमिका कृती समितीने घेतली आहे. त्यानुसार, गुरुवारपासून सर्व जिल्ह्यांमध्ये उग्र आंदोलने केली जातील.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून, मानधनवाढीबाबत समाधानकारक तोडगा काढला जाईल. २७ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर कृती समितीच्या मंचावर उपस्थित राहून, त्यांना पाठिंबा जाहीर केला जाईल, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.

Web Title: Shiv Sena support for the movement of Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.