आरटीईची दुसरी सोडत जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 06:18 AM2018-06-13T06:18:24+5:302018-06-13T06:18:24+5:30

 शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवर राबविण्यात येत असलेली दुसरी प्रवेशाची सोडत पालिका शिक्षण विभागाने जाहीर केली असून त्यामध्ये २,३८२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. दुसऱ्या सोडतीत निवड झालेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठी १२ ते २० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

 RTE's second release | आरटीईची दुसरी सोडत जाहीर

आरटीईची दुसरी सोडत जाहीर

googlenewsNext

मुंबई -  शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवर राबविण्यात येत असलेली दुसरी प्रवेशाची सोडत पालिका शिक्षण विभागाने जाहीर केली असून त्यामध्ये २,३८२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. दुसऱ्या सोडतीत निवड झालेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठी १२ ते २० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
आरटीईची पहिली यादी यापूर्वीच जाहीर झाली असून त्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यानुसार प्रवेश घेतला आहे. मध्यंतरीच्या कालावधीत इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आली असून त्यांचेही नव्याने अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. या वेळेची सोडत फक्त १ ते ३ किलोमीटर अंतरावरील गरजांसाठी असून तिसरी सोडत ३ किलोमीटर आणि त्यापुढील अंतरासाठी असल्याचे पालिका शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत प्रवेश घेणे आवश्यक आहे; अन्यथा ते पुढील फेरीतून बाद होतील, अशा सूचना पालकांना देण्यात आल्या आहेत. तसेच निवड झालेल्या शाळांनी प्रवेश सहकार्य केले नाही किंवा प्रवेश नाकारले तर राज्य बोर्डाच्या शाळांसाठी दादर येथे तर इतर बोर्डाच्या शाळांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन पालिका शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

असे आहे नियोजन
क्षेत्र शाळांची निवड
संख्या
मुंबई (बीएमसी) ३०० १९६८
मुंबई (डीवायडी) ४७ ४१४
एकूण ३४७ २३८२
इयत्ता पहिली
मुंबई (बीएमसी) ३०० ११८१
मुंबई (डीवायडी) ४७ ३०४
एकूण ३४७ १४८५
पूर्व प्राथमिक
मुंबई (बीएमसी) ३०० ७८७
मुंबई (डीवायडी) ४७ ११०
एकूण ३४७ ८९७

Web Title:  RTE's second release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.