'हे आरक्षण टिकूच नये, असं वाटणाराही वर्ग आहे!'; अजित पवारांचा सूचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 12:08 PM2018-11-20T12:08:44+5:302018-11-20T12:20:58+5:30

मराठा आरक्षणावरून आज विधिमंडळ सभागृहात मोठा गदारोळ झाला आहे.

'reservation is not a problem, one of the class that feels not give maratha reservation'; Ajit Pawar's indicator knocks | 'हे आरक्षण टिकूच नये, असं वाटणाराही वर्ग आहे!'; अजित पवारांचा सूचक टोला

'हे आरक्षण टिकूच नये, असं वाटणाराही वर्ग आहे!'; अजित पवारांचा सूचक टोला

मुंबई- मराठा आरक्षणावरून आज विधिमंडळ सभागृहात मोठा गदारोळ झाला आहे. त्यावेळी विरोधकांनी सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच धारेवर धरले आहे. धनगर समाजाचा अहवाल पटलावर ठेवावा, मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला आरक्षण देतो, असं सांगितलं होतं, परंतु आता त्यांनी चेंडू केंद्राकडे टोलवला आहे. शिक्षणाच्या बाबतीत 5 टक्के मुस्लिमांना दिलेलं आरक्षण हायकोर्टानं मान्य केलं आहे, मराठा समाजालाही आरक्षण मिळालंच पाहिजे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात ठेवल्यास घटनात्मक पेच निर्माण होणार असेल तर अहवाल आणूच नका, ओबीसी घटकालाही कोणी तरी आपला हिस्सा काढून घेतोय असं वाटू लागलं आहे. उद्या मागासवर्ग आयोगाचा अहवाल ठेवला की लगेच कोर्टात जाऊन स्थगिती आणायलाही काही जण तयार आहेत, इतरांना त्रास न होता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मराठा आरक्षणावर कोणीही राजकारण करू नये, काही जणांना असंही वाटतं हे आरक्षण पुढे टिकू नये, अशी इच्छा असणाराही एक वर्ग आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असताना घटनात्मक आणि कायद्याच्या चौकटीत पेच निर्माण होता कामा नये, कायद्याच्या चौकटीत बसणारचं आरक्षण द्यावं, असंही अजित पवार म्हणाले आहेत.  

Web Title: 'reservation is not a problem, one of the class that feels not give maratha reservation'; Ajit Pawar's indicator knocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.