'राजकारणाची पार्श्वभूमी नसलेल्या ऊसतोड...' प्रणिती शिंदेंच्या पत्राला राम सातपुतेंचं प्रत्युत्तर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 12:30 PM2024-03-25T12:30:20+5:302024-03-25T12:34:45+5:30

Praniti Shinde Ram Satpute : मी आमदार झाल्यापासून ते आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या, आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केलाय', असं प्रत्युत्तर सातपुते यांनी पत्रातून दिले आहे. 

Ram Satpute's reply to Praniti Shinde's letter no background in politics | 'राजकारणाची पार्श्वभूमी नसलेल्या ऊसतोड...' प्रणिती शिंदेंच्या पत्राला राम सातपुतेंचं प्रत्युत्तर, म्हणाले...

'राजकारणाची पार्श्वभूमी नसलेल्या ऊसतोड...' प्रणिती शिंदेंच्या पत्राला राम सातपुतेंचं प्रत्युत्तर, म्हणाले...

Praniti Shinde Ram Satpute (Marathi News ) : सोलापूर लोकसभेचे  काँग्रेस उमेदवार  प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना एक पत्र लिहून उपरोधिक टोला लगावत स्वागत केले. या पत्राला आता भाजपच्या राम सातपुते यांनी पत्र लिहून प्रत्युत्तर दिले आहे. 'मी २०१९ पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय. मी आमदार झाल्यापासून ते आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या, आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केलाय', असं प्रत्युत्तर सातपुते यांनी पत्रातून दिले आहे. 

'सोलापूरची लेक म्हणून तुमचं स्वागत...', प्रणिती शिंदेंचा राम सातपुतेंना टोला

राम सातपुतेंना सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर 

काल भाजपची लोकसभेच्या उमेदवारांची पाटवी यादी जाहीर झाली. या यादीत महाराष्ट्रातील तीन नावांची घोषणा झाली. सोलापूर लोकसभेसाठी आमदार राम सातपुते यांना यांना उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान, आता काँग्रेच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपच्या राम सातपुते यांच्यात लढत होणार आहे. आज सकाळी प्रणिती शिंदे यांनी एक पत्र ट्विट करत राम सातपुतेंना टोला लगावला आहे. 

'आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे, इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते, असा टोलाही प्रणिती शिंदेंनी पत्रात लगावला होता, या टीकेला आता सातपुतेंनी प्रत्युत्तर दिले आहे. 

राम सातपुतेंचं पत्र काय? 

आ. प्रणिती शिंदेजी,

जय श्रीराम...!

'मी २०१९ पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय. मी आमदार झाल्यापासून ते आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या, आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केलाय, असं प्रत्युत्तर राम सातपुतेंनी आपल्या पत्रातून दिले आहे. 

"मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी मा. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास" या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून कुणी एवढं वर्ष राजकारण केलंय, हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखलंय, असा टोलाही राम सातपुते यांनी टोला लगावला आहे.

"राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटूंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय, त्याला सोलापूरचा सर्वांगिण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन, असंही राम सातपुते यांनी पत्रात म्हटले आहे.

Web Title: Ram Satpute's reply to Praniti Shinde's letter no background in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.