स्वातंत्र्य अमृत महोत्सवासाठी ‘रेल्वे सुवर्ण चौकोन’, ‘हायस्पीड ट्रेन’ने देशातील चार मेट्रो शहरे जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 05:34 AM2017-12-02T05:34:42+5:302017-12-02T05:35:01+5:30

भारतीय रेल्वेतील वरिष्ठ डिझाईनर आणि अभियांत्रिकी अधिकारी सध्या सुवर्ण चौकोनासाठी जोरदार तयारी करीत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशातील चार प्रमुख शहरे हायस्पीड ट्रेनने जोडण्यात येणार आहेत. नवी दिल्ली, चेन्नई, मुंबई आणि कोलकाता या शहरांना

 'Railway Gold Chowkon', 'High Speed ​​Train' will connect four metro cities of the country to the freedom festive mahotsav | स्वातंत्र्य अमृत महोत्सवासाठी ‘रेल्वे सुवर्ण चौकोन’, ‘हायस्पीड ट्रेन’ने देशातील चार मेट्रो शहरे जोडणार

स्वातंत्र्य अमृत महोत्सवासाठी ‘रेल्वे सुवर्ण चौकोन’, ‘हायस्पीड ट्रेन’ने देशातील चार मेट्रो शहरे जोडणार

Next

- महेश चेमटे
मुंबई : भारतीय रेल्वेतील वरिष्ठ डिझाईनर आणि अभियांत्रिकी अधिकारी सध्या सुवर्ण चौकोनासाठी जोरदार तयारी करीत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशातील चार प्रमुख शहरे हायस्पीड ट्रेनने जोडण्यात येणार आहेत. नवी दिल्ली, चेन्नई, मुंबई आणि कोलकाता या शहरांना सेमी हायस्पीड रेल्वेच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाला निती आयोगाने मंजुरी दिली आहे. देशाच्या राजधानीसह आर्थिक राजधानी आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या प्रमुख
शहरांना हायस्पीड रेल्वेने जोडण्यात येणार आहे. यात दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नर्ई या शहरांचा समावेश आहे. शहरांना जोडण्यासाठी भारतीय रेल्वे १० हजार किलोमीटरचे रेल्वे रुळांचे जाळे निर्माण करणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर
या मार्गावरून ताशी १६० किमी या वेगाने ट्रेन धावणार आहे. या प्रकल्पाला सुमारे ३६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
३१ डिसेंबरपर्यंत प्रकल्प निधीच्या तपशिलाला रेल्वे बोर्डाकडून अंतिम रूप देण्यात येणार आहे. या
प्रकल्पाला निती आयोगाची मंजुरी मिळाली आहे. कॅबिनेट मंजुरीची प्रतीक्षा असल्याची माहिती समोर
येत आहे.
प्रकल्पांतर्गत दिल्ली-मुंबई, दिल्ली-हावडा, दिल्ली-चेन्नई, चेन्नई-हावडा, चेन्नई-मुंबई, हावडा-मुंबई या चार मेट्रो शहरांना जोडणाºया मार्गाचे संकल्प चित्र मंगळवारी पूर्ण झाले आहे. सद्य:स्थितीतील या शहरांतील माल वाहतूक करणाºया रेल्वे रुळाचे परिवर्तन हायस्पीड रेल्वे रुळांमध्ये करण्यात येणार आहे.

पायाभरणी आॅगस्ट २०२२मध्ये होणार
रेल्वे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, देशातील चार प्रमुख शहरांना जोडण्यासाठी हायस्पीड रेल्वे निर्माण करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रकल्पाची ब्ल्यूप्रिंट तयार आहे.
अधिकृतरीत्या या प्रकल्पाची पायाभरणी आॅगस्ट २०२२मध्ये होणार आहे. स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षानिमित्त हा प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण ठरेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

वेळ वाचणार
सद्य:स्थितीत भारतीय रेल्वेने २० लाख प्रवासी रोज प्रवास करतात. रोज धावणाºया एक्स्प्रेसचा वेग सुमारे ८५ ते ९० किलोमीटर प्रतितास आहे. हायस्पीड रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. रेल्वेची विश्वासार्हता पाहता प्रवाशांची हायस्पीड रेल्वेला पसंती मिळेल, असा विश्वास वरिष्ठ रेल्वे अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.

Web Title:  'Railway Gold Chowkon', 'High Speed ​​Train' will connect four metro cities of the country to the freedom festive mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.