केस दान करून स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 02:04 AM2018-10-22T02:04:29+5:302018-10-22T02:04:31+5:30

देशातील स्तनाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. २०३० पर्यंत या कर्करोगामुळे महिलांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असेल, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे.

Public awareness about breast cancer by donating hair | केस दान करून स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती

केस दान करून स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती

Next

मुंंबई : देशातील स्तनाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. २०३० पर्यंत या कर्करोगामुळे महिलांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असेल, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर मिलाप या संस्थेने ‘शॉर्टकट आॅक्टोबर’ ही मोहीम सुरू केली आहे. या माध्यमातून केस कापा आणि विग बनविण्यासाठी पाठिंबा दर्शवा, असा संदेश देण्यात येत आहे.
आॅक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत हा उपक्रम राबवून स्तनाच्या कर्करोगाबाबत महिलांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. कॅन्सर पेशंट एड असोसिएशननेही या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.
स्तनाच्या कर्करोगाविषयी व्यापक जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या अवघड परिस्थितीचा
सामना करणाऱ्या लोकांना
प्रोत्साहित करण्यासाठी ‘शॉर्टकट आॅक्टोबर’ नावाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
याविषयी संस्थेचे अध्यक्ष आणि सह संस्थापक अनोज विश्वनाथन यांनी सांगितले की, बºयाचदा कर्करोगाचा सामना करताना स्वत:चे केस गमावून बसतात. त्यामुळे रुग्णांचा आत्मविश्वास कमी होतो. परिणामी रुग्णांच्या मानसिक स्वास्थ्यावर त्याचा दीर्घ परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्यासाठी विग बनवण्यासाठी आणि आर्थिक साहाय्य करण्याकरिता निव्वळ देणगी देऊन लोक केस कमी करून आणि ते दान करून गरजू रुग्णांना मदत करण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात येत आहे. सोशल मीडियावरून आम्ही ही मोहीम राबवित आहोत.

Web Title: Public awareness about breast cancer by donating hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.