सरकारी कार्यालयात २५०० किलो कच-यावर प्रक्रिया, ११ कार्यालयांत उपक्रम : कच-यापासून गांडूळखतनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 03:21 AM2017-10-14T03:21:22+5:302017-10-14T03:21:34+5:30

कच-यावर प्रक्रिया करण्याची सक्ती करणा-या महापालिकेच्या दिव्याखालीच अंधार असल्याची टीका झाल्यानंतर, प्रशासनाने वेगाने पावले उचलली आहेत.

Procurement of 2500 kg of waste in government office, 11 office activities: Vermicomposition from waste | सरकारी कार्यालयात २५०० किलो कच-यावर प्रक्रिया, ११ कार्यालयांत उपक्रम : कच-यापासून गांडूळखतनिर्मिती

सरकारी कार्यालयात २५०० किलो कच-यावर प्रक्रिया, ११ कार्यालयांत उपक्रम : कच-यापासून गांडूळखतनिर्मिती

googlenewsNext

मुंबई: कच-यावर प्रक्रिया करण्याची सक्ती करणा-या महापालिकेच्या दिव्याखालीच अंधार असल्याची टीका झाल्यानंतर, प्रशासनाने वेगाने पावले उचलली आहेत. त्यानुसार, महापालिकेच्या दहा कार्यालयांच्या परिसरासह मंत्रालयाजवळील महिला विकास संस्थेच्या आवारातही कचºयापासून खतनिर्मिती सुरू झाली आहे. या सर्व ११ ठिकाणी मिळून दररोज सुमारे दोन हजार ४०० किलो एवढ्या कचºयापासून गांडूळखतनिर्मिती होत आहे, तर आणखी सहा ठिकाणी एकूण ६०० किलो क्षमतेचे प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
कचºयाची समस्या भीषण स्वरूप घेत असल्याने, महापालिकेने मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांना आपल्याच आवारात कचºयावर प्रक्रिया करण्याची सक्ती केली आहे. दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणाºया सोसायट्यांना हा नियम लागू आहे. मात्र, पालिकेने आपल्याच कित्येक कार्यालयांमध्ये हा प्रकल्प उभा केला नसल्याची टीका होऊ लागली, तसे वेगाने चक्र फिरू लागले. पालिकेच्या काही विभागांमध्ये कचºयावर प्रक्रियेचा प्रकल्प यापूर्वीच सुरू झाला आहे. मात्र, २४ पैकी आणखी आठ विभागांंमध्ये अद्याप कचºयावरील प्रक्रियेला आरंभ झालेला नाही.
पालिकेचे सोसायट्यांना आवाहन
या धर्तीवर आपल्या सोसायटीच्या परिसरात खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याचे मार्गदर्शन हवे असल्यास, शहर विभागातील नागरिकांनी ९००४-४४५-२४४ यावर संपर्क साधावा. पूर्व उपनगरातील नागरिकांनी सुनील सरदार यांच्या ९८३३-५३९-०२३ तर पश्चिम उपनगरातील नागरिकांना पोमसिंग चव्हाण यांच्या ७०४५-९५०-७९७ भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त विजय बालमवार यांनी केले आहे.

Web Title: Procurement of 2500 kg of waste in government office, 11 office activities: Vermicomposition from waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.