पावसाळ्यातील आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 02:07 AM2018-05-30T02:07:43+5:302018-05-30T02:07:43+5:30

पावसाळ्यातील आपत्ती व अडचणींचा सामना करण्यासाठी सर्वच यंत्रणांनी परिपूर्ण तयारी केली आहे. गेल्या वर्षीच्या अडचणी लक्षात घेत

Prepare the machinery to deal with monsoon disasters | पावसाळ्यातील आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज

पावसाळ्यातील आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज

Next

मुंबई : पावसाळ्यातील आपत्ती व अडचणींचा सामना करण्यासाठी सर्वच यंत्रणांनी परिपूर्ण तयारी केली आहे. गेल्या वर्षीच्या अडचणी लक्षात घेत, या वर्षी नियोजन करण्यात आले आहे. पावसाळ्यात सर्व यंत्रणांनी एकमेकांशी अधिक समन्वय ठेवत अडचणींवर मात करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व मॉन्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीस मदत व पुर्नवसनमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता, पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळापूर्वीच्या तयारीबाबत विविध यंत्रणा करत असलेल्या संपूर्ण तयारीचा समग्र आढावा घेतला. मुंबई महापलिका, हवामान विभाग, भारतीय सेना, भारतीय वायुसेना, भारतीय नौसेना त्याचबरोबर राज्यातील विभागीय आयुक्त यांनी आपत्ती निवारणासाठी घेतलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले.
या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षी आलेल्या अडचणी यंदा उद्भवणार नाहीत, यासाठी यंदा योग्य नियोजन झाले आहे. मुंबईत गेल्या वर्षी पाणी साचण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या. या घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाल्याने, या वर्षी अशा ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. Þ
नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे यासाठी मुंबई महापालिकेने विशेष नियोजन केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यबरोबरच विशेष करून मुंबईमध्ये सर्वच यंत्रणांनी पावसाळ्यामध्ये अधिक समन्वय राखत आपत्ती उद्भवल्यास सक्षमपणे तोंड द्यावे. राज्य सरकारकडून यंत्रणांना आवश्यक ती मदत पुरवली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत राज्य आपत्ती व्यवस्थापन आराखडा २०१८ याला मंजुरी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितले. त्याचबरोबर, दुष्काळ व्यवस्थापन आराखडा आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Web Title: Prepare the machinery to deal with monsoon disasters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.