VIDEO- प्लंबर चालवतो मुंबई महापालिकेचा जलविभाग; पी-दक्षिण विभागातील प्रकार, सरकारी संगणक हाताळण्याचीही परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 09:51 AM2018-01-10T09:51:44+5:302018-01-10T10:06:16+5:30

गेल्या काही महिन्यांपासून पालिकेचा जलविभाग एक ‘प्लंबर’ चालवत आहे. हा प्रकार पालिकेच्या पी-दक्षिण विभागात सुरू आहे

Plumber runs water dispute in Mumbai Municipal Corporation; Permission to handle P-South type types, government computers | VIDEO- प्लंबर चालवतो मुंबई महापालिकेचा जलविभाग; पी-दक्षिण विभागातील प्रकार, सरकारी संगणक हाताळण्याचीही परवानगी

VIDEO- प्लंबर चालवतो मुंबई महापालिकेचा जलविभाग; पी-दक्षिण विभागातील प्रकार, सरकारी संगणक हाताळण्याचीही परवानगी

googlenewsNext

- गौरी टेंबकर-कलगुटकर

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून पालिकेचा जलविभाग एक ‘प्लंबर’ चालवत आहे. हा प्रकार पालिकेच्या पी-दक्षिण विभागात सुरू आहे. मुख्य म्हणजे पालिकेचे अधिकारी त्या प्लंबरवर इतके मेहेरबान आहेत की पालिकेचा संगणकदेखील त्यांच्यासमोर तो अगदी सहजरीत्या हाताळतो. याचाच व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती लागला असून, हे प्रकरण आता पालिकेच्या जलविभागाचे वरिष्ठ अधिकारी पडताळून पाहत आहेत. अयाज खान (३०) असे या प्लंबरचे नाव आहे.

अयाज याने पालिकेच्या पी-दक्षिण विभागातील जल विभागाची सूत्रे हाती घेतल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ‘लोकमत’च्या हाती लागलेल्या व्हिडीओमध्ये अयाज हा पी-दक्षिण विभागात कनिष्ठ अभियंत्याच्या कार्यालयात संगणक हाताळताना दिसत आहे. शेजारीच पालिकेच्या जलविभागातील अधिकारी निवांतपणे दिसत आहे. त्यावरून या प्लंबरला सूट का दिली आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. महत्त्वाचे म्हणजे अयाजकडून आलेली फाईल अधिकारी लगेचच क्लिअर करतात. मात्र तीच फाईल अन्य कोणा प्लंबरमार्फत आली तर त्याला कधी कधी चार महिने मुहूर्त मिळत नाही.

अयाज हा लोकांकडून अव्वाच्या सव्वा पैसा आकारतो. त्यामुळे त्याच्याकडून काम करून घेण्यासाठी आम्ही जात नाही. चार महिन्यांपूर्वी म्हणजे ६ सप्टेंबर २०१६ रोजी आम्ही (PSIDN849436) या IDN क्रमांकाने जलवाहिनी जोडण्यासाठी ऑनलाइन बुकिंग केली आहे. मात्र कधी म्हाडाचे ना हरकत प्रमाणपत्र आणा तर कधी मी बाहेर आहे; तसेच अनेकदा तर बघू, करू अशी उडवाउडवीची उत्तरे आम्हाला दिली जातात, असे स्थानिक पौर्णिमा काणकोणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याचे कारण निव्वळ आम्ही अयाजला काम न देता आम्हाला परवडणाºया दुसऱ्या प्लंबरकडून काम करून घेतो हेच आहे. तेच काम अयाजला दिले असते तर ते अगदी पहिल्याच दिवशीदेखील झाले असते, असा आरोपही त्यांनी केला.


अधिकाऱ्यांची मिलीभगत
गोरेगावमध्ये १९५७ साली बसविलेली जलवाहिनी आहे. ही जलवाहिनी म्हाडाची असून, तिच्या देखभाल-दुरुस्तीचे काम महापालिकेला देण्यात आले आहे. मात्र त्यासाठी एका व्यक्तीमागे प्लंबर १० ते १२ हजार रुपये मागतो. जो खर्च सामान्य माणसाला परवडत नाही. एखादा प्लंबर जर स्वस्तात जलवाहिनी बसवून देत असेल तर पालिका अधिकारी त्यांच्या मर्जीतील लोकांना काम देतात. अन्यथा काम करून देण्यात हयगय करतात. त्यामुळेच अधिकारी आणि प्लंबरच्या या ‘नेक्सस’वर कारवाई होणे गरजेचे आहे; तरच सामान्य माणसांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबेल. तसेच प्लंबरच्या मनमानी कारभारालादेखील चाप बसेल.
- संदीप पटेल, स्थानिक नगरसेविका

‘क्लिप’ची पडताळणी करणार
संबंधित व्हिडीओ क्लिप ही कितपत खरी आहे; याची आम्ही पडताळणी करू. त्यानंतर यावर चौकशी बसवून कारवाई करण्यात येईल. 
- ए. तवाडीया (मुख्य जलअभियंता, महापालिका)

Web Title: Plumber runs water dispute in Mumbai Municipal Corporation; Permission to handle P-South type types, government computers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.