घाटकोपर-मानखुर्द मार्गावर पिलर कोसळला, वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 17:28 IST2018-10-20T17:10:19+5:302018-10-20T17:28:57+5:30

घाटकोपर मानखुर्द मार्गावर पिलर कोसळल्याने दुर्घटना घडली आहे.

Pillar collapses on Ghatkopar-Mankhurd road, traffic disrupted | घाटकोपर-मानखुर्द मार्गावर पिलर कोसळला, वाहतूक विस्कळीत

घाटकोपर-मानखुर्द मार्गावर पिलर कोसळला, वाहतूक विस्कळीत

मुंबईमुंबईतील घाटकोपर-मानखुर्द मार्गावर पिलर कोसळल्याने दुर्घटना घडली आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील शिवाजी नगर सिग्नलजवळ पुलाचं बांधकामं सुरू असताना ही दुर्घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र पिलरखाली सापडल्याने एक कार आणि दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच या दुर्घटनेमुळे घाटकोपर - मानखुर्द मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. 

 दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर सिंग्नलजवळ ही घटना घडली. लोखंडी पुलाचे बांधकाम सुरू होते. मात्र, कंत्राटदाराकडून योग्य ती काळजी न घेतल्यामुळे लोखंडी गर्डर कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. या गर्डरखाली एक कार आणि मोटारसायकल सापडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड मागार्ने जर प्रवास करणार असला तर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वाहनधारकांनी एेरोली किंवा ठाणे मार्गे नवी मुंबईला जावे. तसंच नवी मुंबईकडून जर मुंबईकडे येणार असाल तर ठाणे आणि एेरोली मार्गे आपण मुंबईकडे प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नवी मुंबईकडे आणि नवी मुंबईकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. लोखंडी गर्डर काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गर्डर हटवण्यासाठी क्रेन मागवण्यात आली आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.

 



 

Web Title: Pillar collapses on Ghatkopar-Mankhurd road, traffic disrupted