मानवाधिकार आयोगाची पालिका आयुक्तांना नोटीस, विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 05:23 AM2018-01-05T05:23:32+5:302018-01-05T05:23:46+5:30

कमला मिल कंपाउंडमधील जळीतकांडाची राज्य मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. यासंदर्भात २९ जानेवारी १८ पर्यंत विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांना दिले आहेत.

 Order to submit a detailed report to the municipal commissioner's municipal commissioner | मानवाधिकार आयोगाची पालिका आयुक्तांना नोटीस, विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश

मानवाधिकार आयोगाची पालिका आयुक्तांना नोटीस, विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश

Next

मुंबई  - कमला मिल कंपाउंडमधील जळीतकांडाची राज्य मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. यासंदर्भात २९ जानेवारी १८ पर्यंत विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांना दिले आहेत.
कमला मिल कंपाउंडमधील हॉटेल वन अबव्ह, मोजेस बिस्ट्रो येथे २९ डिसेंबरला लागलेल्या आगीत १४ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यापुर्वी काही दिवस आधी साकीनाका येथील फरसाण दुकानाला लागलेल्या आगीत १२ कामगारांचा बळी गेला होता. या दोन्ही दुर्घटनांमध्ये मानवी हक्कांची पायपल्ली झाल्याची तक्रार मुंबई भाजपाचे सरचिटणीस विवेकानंद गुप्ता यांनी मानवाधिकार आयोगाकडे केली.
१ जानेवारी रोजीच्या या तक्रारीची दखल घेत राज्य मानवाधिकार आयोगाने मुंबई महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार जळीतकांडाबाबत २९ जानेवारीपर्यंत विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश मानवाधिकार आयोगाने पालिका आयुक्त अजय मेहता यांना दिले आहेत. त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.

Web Title:  Order to submit a detailed report to the municipal commissioner's municipal commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.