अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 08:13 PM2018-06-29T20:13:49+5:302018-06-29T20:15:06+5:30

अँटॉप हिल पोलीस ठाण्याच्या परिसरात अल्पवयीन मुलगा घरी एकटाच असताना जोगवा मागण्यासाठी आलेल्या नराधमाने घरात प्रवेश केला. घराचा दरवाजा आतून बंद केला आणि अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक लैंगिक छळ केला.

one man arrested for sexually assaulting a minor child | अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी जेरबंद 

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी जेरबंद 

Next

मुंबई - अँटॉप हिल पोलीस ठाण्याच्या परिसरात अल्पवयीन मुलगा घरी एकटाच असताना जोगवा मागण्यासाठी आलेल्या नराधमाने घरात प्रवेश केला. घराचा दरवाजा आतून बंद केला आणि अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक लैंगिक छळ केला. प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईने अँटॉप हिल पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पॉक्सो कायद्यान्वये हा गुन्हा पोलिसांनी दाखल केला. गुन्हा गंभीर आणि संवेदनशील असल्याने गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक ४ ने विशेष पथक तयार करून तपास कार्य सुरु केले. त्यानंतर खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्याआधारे आरोपीस कुर्ला रेल्वे स्थानकातून बेड्या ठोकल्या आहेत. 

२६ जूनला अल्पवयीन मुलाची आई झोपलेल्या मुलास उठवून घरकाम करण्यासाठी निघाली. दुपारी १ वाजताच्या सुमारास मुलाची आई घरकाम करून परतली. तेव्हा मुलगा घरी नव्हता. काही वेळाने तो घरी आला आणि घडलेला सर्व प्रकार त्याने आईस सांगितला. त्यानंतर आईने अँटॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. २६ जूनला सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास पीडित मुलगा घरी एकटाच असताना दारोदारी जोगवा मागत फिरणाऱ्या एक इसम घरासमोर आला. त्या इसमाने मुलाकडे पैसे मागितले. मात्र, मुलाकडे पैसे नसल्याने त्याने घरातील तांदूळ दिले. दरम्यान आरोपी इसमाने घरात प्रवेश करत मुलासोबत जबरदस्तीने अश्लील चाले करू लागला. तसेच मुलासोबत लैंगिक अत्याचार केला आणि निघून गेला. असा घडला प्रकार मुलाने आईला सांगितला. घडलेल्या प्रकारची गंभीरता पाहता गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक ४ ने विशेष पथक तयार करून आरोपीला कुर्ला रेल्वे स्टेशनहून अटक केली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश रेव्ले, पोलीस उपनिरीक्षक दिनेश खैरनार, पोलीस हवालदार नार्वेकर, पोलीस नामदार बल्लाळ, तळेकर आणि पाटील यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. 

Web Title: one man arrested for sexually assaulting a minor child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.