बेकायदा बांधकामांना अभय देणारे अधिकारी रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 05:05 AM2018-01-02T05:05:50+5:302018-01-02T05:05:59+5:30

कमला मिल कम्पाउंडमधील आगीच्या दुर्घटनेनंतर जाग आलेल्या महापालिकेने मुंबईभर बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू केली. मात्र, एका दिवसात साडेतीनशे बांधकामे पाडण्यात आल्याने, या बांधकामांबाबत अधिका-यांकडे माहिती असताना

 Officer on the basis of illegal construction, on radar | बेकायदा बांधकामांना अभय देणारे अधिकारी रडारवर

बेकायदा बांधकामांना अभय देणारे अधिकारी रडारवर

Next

मुंबई : कमला मिल कम्पाउंडमधील आगीच्या दुर्घटनेनंतर जाग आलेल्या महापालिकेने मुंबईभर बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू केली. मात्र, एका दिवसात साडेतीनशे बांधकामे पाडण्यात आल्याने, या बांधकामांबाबत अधिकाºयांकडे माहिती असताना, आतापर्यंत कारवाई का झाली नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. परिणामी, संबंधित विभागातील इमारत व कारखाना, सार्वजनिक आरोग्य खाते आणि मुंबई अग्निशमन दलातील अधिका-यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे चौकशीचा ससेमिरा मागे लागणार असल्याने, अधिकाºयांचे धाबे दणाणले आहेत.
कमला मिल कम्पाउंडमधील ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजो बिस्ट्रो’ रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी लागलेल्या आगीत १४ जण मृत्युमुखी पडले. अग्निशमन यंत्रणेचा अभाव आणि बेकायदा बांधकाम या निष्पाप बळींसाठी जबाबदार असल्याचे समोर आल्यानंतर, जी दक्षिण विभागातील पाच अधिकाºयांना निलंबित करण्यात आले, तर सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर, गेल्या दोन दिवसांत मुंबईतील सुमारे ७०० बेकायदा बांधकामे पाडण्यात आली आहेत.
मात्र, एका दिवसात कारवाईची तत्परता दाखवून, आतापर्यंत या बांधकामांना अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याचे एकप्रकारे सिद्धच केले आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी कारवाई केली, तिथे विभागस्तरीय इमारत व कारखाने खात्यातील अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिकारी, तसेच मुंबई अग्निशमन दलातील अधिकाºयांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे का? व्यावसायिक तक्रारदारांबरोबर अधिकारी कर्मचाºयांचे संगनमत होते का? याबाबत सर्व ७ परिमंडळांच्या उपायुक्तांनी तपासणी करून, अशा अधिकाºयांची नावे सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी सोमवारी दिले आहेत.
दरम्यान विभाग स्तरावर अनधिकृत बांधकामांची तक्रार करून, त्यानंतर संबंधितांबरोबर मांडवली करणारे व्यावसायिक तक्रारदारही अडचणीत येणार आहेत. विभागातील अधिकारी आणि व्यावसायिक तक्रारदारांचे संगनमत आहे का, याचीही चौकशी पालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे.

Web Title:  Officer on the basis of illegal construction, on radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.