पैसे भरूनही पास नाही! आर्थिक लुटीमुळे पालक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 04:23 AM2018-07-29T04:23:06+5:302018-07-29T04:23:18+5:30

बेस्ट प्रशासनाच्या ट्रायमॅक्स कंपनीसोबत संपलेल्या कराराचा फटका आता शालेय विद्यार्थ्यांनाही बसू लागला आहे. मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांकडून पंचमासिक पासचे पैसे घेणाऱ्या बेस्टकडून पासऐवजी केवळ पावती देण्यात येत आहे.

 Not even paying by paying! Parents are angry due to financial plunder | पैसे भरूनही पास नाही! आर्थिक लुटीमुळे पालक संतप्त

पैसे भरूनही पास नाही! आर्थिक लुटीमुळे पालक संतप्त

Next

मुंबई : बेस्ट प्रशासनाच्या ट्रायमॅक्स कंपनीसोबत संपलेल्या कराराचा फटका आता शालेय विद्यार्थ्यांनाही बसू लागला आहे. मुंबईतील
शालेय विद्यार्थ्यांकडून पंचमासिक पासचे पैसे घेणाऱ्या बेस्टकडून पासऐवजी केवळ पावती देण्यात येत आहे. परिणामी, पैसे भरल्यानंतरही पास मिळाला नसल्याने तिकीट
काढून प्रवास करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. एकीकडे पासचे पैसे घेणारे बेस्ट प्रशासन विद्यार्थ्यांना तिकीट काढण्यास
सांगून आर्थिक लूट करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.
मुंबई शहरासह उपनगरात विद्यार्थ्यांना शाळांपर्यंत पोहचण्यासाठी बेस्टकडून विशेष
बस सोडण्यात येतात. मुंबईत सुमारे ६० हजार विद्यार्थ्यांकडून या सेवेचा लाभ घेतला जात आहे. मात्र जून ते नोव्हेंबर महिन्यांपर्यंतच्या या पाससाठी विद्यार्थ्यांनी जूनमध्ये पैसे भरल्यानंतरही अद्याप पास मिळाली नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. महत्त्वाची
बाब म्हणजे पाससाठी भरलेल्या पैशांची पावती असून अनेक विद्यार्थ्यांना तिकीट काढावे
लागत आहे. त्यामुळे प्रवासासाठी आगाऊ पैसे भरल्यानंतरही विद्यार्थ्यांची आर्थिक लूट बेस्ट करत असल्याचा आरोप संदीप परब यांनी केला आहे.
सकाळ व दुपारच्या सत्रात लालबाग ते परळदरम्यानचे
१०६ विद्यार्थी एकाच शाळेत जाण्यासाठी बेस्टच्या या सेवेचा
वापर करतात. चालक व वाहक ओळखीचे असल्याने विद्यार्थ्यांना पासऐवजी पावती असल्याने त्रास सहन करावा लागत नाही. मात्र ही बस चुकल्यास अन्य कोणत्याही बसचा आधार घेताना विद्यार्थ्यांना तिकीट काढावे लागत असल्याची माहिती संदीप परब यांनी दिली. महत्त्वाची बाब म्हणजे शाळेत अतिरिक्त तास असल्यास बहुतेक विद्यार्थ्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पास नसल्याचे कारण सांगत वाहकांकडून विद्यार्थ्यांवर तिकीट काढण्याची सक्ती केली जात असल्याचेही बर यांनी सांगितले.

ओळखपत्राचा वापर करता येईल!
बेस्टने पास वितरित करेपर्यंत विद्यार्थ्यांकडे असलेली पैसे भरणाची पावती पाहून प्रवासात सूट देण्याची मागणी पालकांनी केली आहे. त्यात विद्यार्थ्याचे शाळेचे ओळखपत्र आणि पावतीवरील नाव यांची तपासणी केल्यास कोणताही विद्यार्थी पावतीचा गैरवापर करू शकणार नाही, असा दावाही पालकांनी केला आहे.

Web Title:  Not even paying by paying! Parents are angry due to financial plunder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.