नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठरावाला सेनेचा पाठिंबा नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 01:12 AM2018-03-18T01:12:53+5:302018-03-18T01:12:53+5:30

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध विरोधी पक्ष संयुक्तपणे अविश्वास ठराव आणणार असतानाच त्यात शिवसेना विरोधी पक्षांसोबत नसेल, असे शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी शनिवारी स्पष्ट केले. मात्र, विरोधी पक्ष एकत्र आले तर देशात वेगळा निकाल लागू शकतो, असा सूचक इशाराही त्यांनी भाजपाला दिला.

No support for Narendra Modi government against unbelief! | नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठरावाला सेनेचा पाठिंबा नाही!

नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठरावाला सेनेचा पाठिंबा नाही!

Next

मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध विरोधी पक्ष संयुक्तपणे अविश्वास ठराव आणणार असतानाच त्यात शिवसेना विरोधी पक्षांसोबत नसेल, असे शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी शनिवारी स्पष्ट केले. मात्र, विरोधी पक्ष एकत्र आले तर देशात वेगळा निकाल लागू शकतो, असा सूचक इशाराही त्यांनी भाजपाला दिला.
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, विरोधक अविश्वास ठराव आणणार असले तरी तो टिकणार नाही. ही अपरिपक्व राजकीय खेळी आहे. हात दाखवून अवलक्षण अशी विरोधकांची भूमिका असू नये. विरोधकांची झाकली मूठ अशी उघडी करू नये. सरकार पडण्याची स्थिती दिसत नाही. भाजपाकडे पुरेसे संख्याबळ आहे आणि केंद्र सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल.
भाजपा विरोधात काही पक्ष एकत्र येत आहेत पण या घडामोडींमध्ये शिवसेना कुठेही नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने कधीही काम केलेले नाही. पण भक्कम विरोधी पक्ष असणे हे देशाच्या लोकशाहीसाठी सुचिन्ह आहे. काही विरोधी पक्ष एकत्र आले तर भाजप विरोधात वातावरण तयार होऊ शकते हे आम्ही आधीपासून बोलत आलो आहोत आणि भाजपाने त्या बाबत आत्मचिंतन करणे आवश्यक आहे, असेही राऊत म्हणाले.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत २०१९ मधील लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा शिवसेनेने अनेकदा दिलेला आहे. मात्र, राऊत यांच्या वक्तव्यामुळे केंद्र व राज्यात तूर्त तरी शिवसेना भाजपासोबतच राहील,असे स्पष्ट दिसते.

Web Title: No support for Narendra Modi government against unbelief!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.