मुलाखतीसाठी अभ्यास गरजेचा

By admin | Published: October 5, 2014 12:38 AM2014-10-05T00:38:40+5:302014-10-05T00:38:40+5:30

कोणाचीही मुलाखत घेताना संबंधित व्यक्तीच्या कार्याची माहिती असणो आवश्यक आहे.

Need an interview for interview | मुलाखतीसाठी अभ्यास गरजेचा

मुलाखतीसाठी अभ्यास गरजेचा

Next
>मुंबई : कोणाचीही मुलाखत घेताना संबंधित व्यक्तीच्या कार्याची माहिती असणो आवश्यक आहे. अशा पद्घतीने मुलाखतीचे शा आणि अंग जपत  मुलाखत घेतली तर ती नक्कीच यशस्वी होते. त्यामुळे मुलाखतीसाठी अभ्यास गरजेचा असल्याचे प्रदीप भिडे यांनी सांगितले. 
कोकण मराठी साहित्य परिषदेची विलेपार्ले शाखा आणि आणि बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संयुक्त विद्यमाने उद्यानाच्याच एनआयसी सभागृहात ‘मुलाखत मुलाखतकारांची’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी ते बोलत होते. 
ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याच्याबरोबर आमची मैत्री असत़े त्यामुळे सहज गप्पा मारता मारता मुलाखत घेतल्याने ती जास्त रंगत जाते, असे रवींद्र आवटी म्हणाले. 35 वर्षाच्या काळात अनेकांशी संबंध आला, त्यांच्याशी जवळचे नाते आपसूकच निर्माण झाले. त्यामुळे अशांचे अनुभव माहीत असाताना त्यांची मुलाखत घेताना फारशी अडचण येत नाही, असे निवेदक अशोक शेवडे यांनी सांगितले. या मुलाखतकारांना बोलते करण्याचे काम गौरी कुलकर्णी आणि लता गुठे यांनी केले. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचीही विशेष उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Need an interview for interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.