नवी मुंबई विमानतळ भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

By Admin | Published: January 31, 2015 02:27 AM2015-01-31T02:27:56+5:302015-01-31T02:27:56+5:30

आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. संमतीपत्रे सादर करण्याची मुदत संपुष्टात आली

Navi Mumbai Airport Land Acquisition Process In the last phase | नवी मुंबई विमानतळ भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

नवी मुंबई विमानतळ भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

googlenewsNext

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. संमतीपत्रे सादर करण्याची मुदत संपुष्टात आली आहे. आतापर्यंत ९६ टक्के जमिनीची संमतीपत्रे प्राप्त झाल्याची माहिती भूसंपादन अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी एकूण २२६८ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. त्यापैकी १५९७ हेक्टर सिडकोने संपादित केली आहे. उर्वरित बारा महसुली गावातील ६७१ हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. संपादित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात संबंधित भूधारकांना २२.५ टक्के विकसित भूखंड व इतर आकर्षक पुनर्वसन पॅकेज देण्यात येईल. त्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Navi Mumbai Airport Land Acquisition Process In the last phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.