आयएनएस कलवरी पाणबुडीमुळे नौदल अधिक सक्षम - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:19 AM2017-12-15T01:19:10+5:302017-12-15T01:19:18+5:30

आयएनएस कलवरी या पाणबुडीच्या रूपाने भारतीय नौदलाच्या ताफ्यात आणखी एका प्रभावी अस्त्राची भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या शानदार सोहळ्यात आयएनएस कलवरी गुरुवारी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली.

Naval is more capable due to INS Kalwari submarine - Prime Minister Narendra Modi | आयएनएस कलवरी पाणबुडीमुळे नौदल अधिक सक्षम - पंतप्रधान नरेंद्र मोदी

आयएनएस कलवरी पाणबुडीमुळे नौदल अधिक सक्षम - पंतप्रधान नरेंद्र मोदी

googlenewsNext

मुंबई : आयएनएस कलवरी या पाणबुडीच्या रूपाने भारतीय नौदलाच्या ताफ्यात आणखी एका प्रभावी अस्त्राची भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या शानदार सोहळ्यात आयएनएस कलवरी गुरुवारी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली. आयएनएस कलवरी ही पाणबुडी ‘मेक इन इंडिया’चे उत्कृष्ट उदाहरण असून, तिच्या समावेशाने भारतीय नौदल अधिक सक्षम झाल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
मुंबईतील नौदलाच्या गोदीत झालेल्या या सोहळ्यास पंतप्रधान मोदी यांच्यासह राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण, संरक्षण राज्यमंत्री
सुभाष भामरे, नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा आणि नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आयएनएस कलवरीमुळे भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी भर पडली आहे. २१वे शतक हे आशियाई देशांचे शतक मानले जाते. या शतकात, विकासाचा मार्ग हिंदी महासागराद्वारेच होणार हे निश्चित असून त्यामुळेच राष्ट्रीय धोरणांमध्ये हिंदी महासागराला विशेष स्थान आहे. हिंदी महासागरात जागतिक धोरणात्मक आणि आर्थिक हिताबाबत भारत पूर्णत: सजग आहे. त्यामुळेच आधुनिक आणि बहुआयामी भारतीय नौदल, या प्रदेशात शांतता आणि स्थैर्याला प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
सरकारची धोरणे आणि सैन्यदलांचे शौर्य यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये छुपे युद्ध म्हणून दहशतवादाचा वापर करण्याची चाल अयशस्वी ठरत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
कलवरी ही डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी असून माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने भारतीय नौदलासाठी बांधली आहे. अशा प्रकारच्या एकूण सहा पाणबुड्या भारतीय नौदलात दाखल होणार असून कलवरी ही या ताफ्यातील पहिली पाणबुडी आहे. फ्रान्सच्या सहकायार्तून हा प्रकल्प साकारला आहे.

भारताची भूमिका महत्त्वाची
समुद्रमार्गे सुरू असलेला दहशतवाद असो किंवा पायरसी, तस्करी, बेकायदेशीर मासेमारी; या आव्हानांशी लढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या तीन वर्षांत देशाच्या सुरक्षेशी संबंधित व्यवस्थेत बदल होण्यास सुरुवात झाली आहे. आयएनएस कलवरी हे भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक भागीदारी वाढत असल्याचे उत्तम उदाहरण असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

Web Title: Naval is more capable due to INS Kalwari submarine - Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.