घोटाळेबाज ठेकेदारांकडून महापालिकेची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:51 AM2018-01-17T01:51:42+5:302018-01-17T01:51:52+5:30

एकीकडे मुंबईत ओला व सुका कचरा वेगळा करण्याची सक्ती केली जात असतानाच हा कचरा उचलणाºया ठेकेदारांनी मात्र महापालिकेची कोंडी केली आहे.

Municipal corporation's suspension from scam contractor | घोटाळेबाज ठेकेदारांकडून महापालिकेची कोंडी

घोटाळेबाज ठेकेदारांकडून महापालिकेची कोंडी

Next

मुंबई : एकीकडे मुंबईत ओला व सुका कचरा वेगळा करण्याची सक्ती केली जात असतानाच हा कचरा उचलणाºया ठेकेदारांनी मात्र महापालिकेची कोंडी केली आहे. फेरनिविदा मागवूनही घोटाळेबाज ठेकेदार निविदा भरत असल्याने पालिकेची पुरती पंचाईत झाली आहे. त्यामुळे कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यासाठी पुन्हा एकदा निविदा मागविण्यात येणार आहेत.
संपूर्ण मुंबईतून कचरा उचलण्यासाठी दिलेल्या कंत्राटाची मुदत गेल्या वर्षी संपली. मात्र, नव्याने ठेकेदारांची निवड होईपर्यंत जुन्याच ठेकेदारांना काम सुरू ठेवण्यास सांगण्यात आले़ जुन्या ठेकेदारांनाच काम मिळत राहावे म्हणून प्रशासन वेळकाढू धोरण अवलंबित असल्याचा आरोप नगरसेवक करीत आहेत. तर घोटाळेबाज ठेकेदारच पुन्हा पुन्हा निविदा प्रक्रियेत सहभागी होत असल्याने पालिकेपुढे पर्याय उरलेला नाही, असा बचाव प्रशासन करीत आहे.
दररोज मुंबईतून ७ हजार १०० टन कचरा उचलून कचराभूमीपर्यंत वाहून नेण्यात येतो. महापालिकेने २०१२मध्ये आठ ठेकेदारांना कचरा उचलण्याचे पाच वर्षांचे कंत्राट दिले होते. यासाठी प्रति टन आठशे रुपये पालिका ठेकेदारांना देत होती. या कंत्राटाची मुदत गेल्या वर्षी संपली. गेल्या जून आणि सप्टेंबर महिन्यात निविदा मागविण्याचा प्रयत्न फोल ठरला. त्यामुळे मुंबईची १४ गटांमध्ये विभागणी करून १ हजार ८०० कोटींचे कंत्राट पुन्हा मागविण्यात येणार आहे.

जून २०१७मध्ये मागविलेल्या पहिल्या निविदेला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने ही प्रक्रिया रद्द करण्यात आली, तर दुसºयांदा सप्टेंबर महिन्यात मागविलेल्या निविदेला १५ कंपन्यांनी प्रतिसाद दिला. मात्र, यापैकी सहा कंपन्यांच्या संचालकांवर कचºयात डेब्रिज टाकून वजन वाढविण्याच्या घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप असून त्यांच्यावर पोलिसांमार्फत कारवाई सुरू आहे. दुसरीकडे नालेसफाईच्या कामात घोटाळ्याचा आरोप असलेल्या ठेकेदारांच्या पत्नी निविदा प्रक्रियेत सहभागी असलेल्या उर्वरित चार कंपनीच्या संचालक पदावर आहेत़ त्यामुळे ही निविदा प्रक्रिया बाद करून नव्याने निविदा मागविण्यात येणार आहेत.

नवीन कंत्राट कालावधीत वाढ
या वेळेस कंत्राटाचा कालावधी सात वर्षांचा करण्यात आला असून ठेकेदारांना कचरा उचलण्यासाठी प्रति टन सातशे रुपये मिळणार आहेत. मात्र, ठेकेदारांना कचरा उचलणे व वाहून नेण्यासाठी कचºयाचे डबे आणि मनुष्यबळ पुरविण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे.

मुंबईतून दररोज सात हजार १०० मेट्रिक टन कचरा उचलण्यात येतो़ हा कचरा वाहून देवनार, कांजूरमार्ग आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर नेण्यात येतो़
यापूर्वी २०१२ ते २०१७ या पाच वर्षांसाठी कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात आले होते़ हे कंत्राट एक हजार कोटी रुपयांचे होते़
कचरा उचलण्यासाठी महापालिकेकडे साडेतीनशे वाहने असून ठेकेदारांकडे १ हजार १०० वाहने आहेत़

Web Title: Municipal corporation's suspension from scam contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.