पिंपरी-चिंचवडचा आराखडा मुंबई महापालिका तयार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 05:02 AM2017-10-29T05:02:51+5:302017-10-29T05:03:05+5:30

नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या शिफारशीने पिंपरी चिंचवड महापालिकेचा आराखडा आता मुंबई महापालिकेचा विकास नियोजन विभाग तयार करणार आहे.

The Municipal Corporation of Pimpri-Chinchwad will be prepared | पिंपरी-चिंचवडचा आराखडा मुंबई महापालिका तयार करणार

पिंपरी-चिंचवडचा आराखडा मुंबई महापालिका तयार करणार

Next

मुंबई : नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या शिफारशीने पिंपरी चिंचवड महापालिकेचा आराखडा आता मुंबई महापालिकेचा विकास नियोजन विभाग तयार करणार आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणापाठोपाठ आता पिंपरी चिंचवडच्या विकासाला मुंबई आकार देणार आहे.
२०१४-२०३४चा मुंबईचा विकास नियोजन आराखडा २७ मे २०१६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. तो अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुधारित केला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेनेही या तंत्रज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग करून विकास आराखडा बनविण्यासाठी मुंबई महापालिकेचा विचार करावा, असे पत्र नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना पाठविले होते. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जुन्या हद्दीची विकास योजना दुसºयांदा सुधारित करण्यासाठी मुंबई महापालिकेचे सहकार्य घेण्यात येणार आहे. कार्यपद्धती व अपेक्षित खर्चाची माहिती पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी मागविली होती. त्याप्रमाणे मुंबई महापालिकेने आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचे निवेदन प्रशासनाने मांडल्यानंतर स्थायी समितीने त्यास मंजुरी दिली.

Web Title: The Municipal Corporation of Pimpri-Chinchwad will be prepared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.