मुंबईकर पाणी जपून वापरा, १५ टक्के पाणी कपात

By सचिन लुंगसे | Published: April 5, 2023 08:26 PM2023-04-05T20:26:44+5:302023-04-05T20:26:53+5:30

मुंबईकरांनी पाणी काटकसरीने वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Mumbaikars use water sparingly, 15 percent water reduction | मुंबईकर पाणी जपून वापरा, १५ टक्के पाणी कपात

मुंबईकर पाणी जपून वापरा, १५ टक्के पाणी कपात

googlenewsNext

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही गळती दुरुस्त करण्याचे काम शुक्रवार ३१ मार्च २०२३ पासून वेगाने सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्यात १५ टक्के पाणीकपात लागू आहे. मात्र, पर्यायी वितरण व्यवस्था व भौगोलिक परिस्थिती यांच्या मर्यादा लक्षात घेता पाणीपुरवठ्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी काटकसरीने वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

भांडूप संकुल येथील जलशुध्दीकरण केंद्रास ७५ टक्के पाणीपुरवठा हा ५,५०० मिलीमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर जलबोगद्याद्वारे होतो. सदर जलबोगद्यास ठाणे येथे कूपनलिकेचे खोदकाम सुरू असताना हानी पोहोचून पाणी गळती सुरू झाली होती. ही गळती दुरुस्तीसाठी सदर जलबोगदा दिनांक ३१ मार्च २०२३ पासून बंद केला आहे. ही बाब लक्षात घेता, बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी व बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे शहरास होणाऱया प्रक्रियायुक्‍त पाणीपुरवठ्यात दिनांक ३१ मार्च २०२३ पासून जलबोगदा पाणी गळती दुरुस्‍तीचे काम पूर्ण होईपर्यंत अंदाजे ३० दिवस कालावधीसाठी १५ टक्‍के कपात करण्‍यात येत आहे.

असे असले, तरी पर्यायी जलवाहिन्यांद्वारे भांडूप संकुल जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचविण्यात येत आहे. हा पाणीपुरवठा करताना मुंबई शहर व उपनगरातील काही भागात, उंचावर राहणाऱ्या आणि पाणी वाटप क्षेत्राच्या टोकाकडील लोकवस्तीस १५ टक्क्यांपेक्षा जास्त, पाणीकपात जाणवू शकते. या भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वितरण व्यवस्था व महानगरातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे मुंबई शहर व उपनगरातील सर्व नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी केले आहे.

Web Title: Mumbaikars use water sparingly, 15 percent water reduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.