मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार, लवकरच 70 लोकलमध्ये एसी यंत्रणा - पियुष गोयल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 05:31 AM2018-03-30T05:31:18+5:302018-03-30T05:31:18+5:30

शिवसेनेच्या बहिष्कार व घोषणाबाजी मुळे या उदघाटन सोहळ्याला गालबोट लागले.

Mumbaikar's journey will be canceled, soon the AC machinery will be in the 70 local trains - Piyush Goyal | मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार, लवकरच 70 लोकलमध्ये एसी यंत्रणा - पियुष गोयल

मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार, लवकरच 70 लोकलमध्ये एसी यंत्रणा - पियुष गोयल

Next

मनोहर कुंभेजकर 

मुंबई - मुंबईतील रेल्वेवासियांचा प्रवास गारेगार करण्यासाठी 70 लोकल मध्ये एसी यंत्रणा कार्यान्वित करून रोज 250 ते 300 फेऱ्या सुरू करण्यात येतील.प्रत्येक लोकल मध्ये 3 डबे एसीचे असतील यामध्ये 1 डबा हा महिलांसाठो  व सेकंड क्लास एसीचा डबा देखिल असेल अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली. त्यांच्या हस्ते गोरगाव ते सीएसटी हार्बर रेल्वेला काल रात्री 10.07 मिनिटांनी त्यांनी हिरवा कंदील दाखवला.भविष्यात  सीएसटी ते गोरेगाव हार्बर सेवा बोरिवली पर्यंत विस्तारित करणार असल्याची घोषणा देखिल त्यांनी केली.गेली अनेक वर्षे अंधेरी ते गोरेगाव पर्यंत हार्बर रेल्वे सेवा विस्तारि करणाची प्रतीक्षा आज अखेर संपली.

गेली 70 वर्षे मराठवाड्याकडे दुर्लक्ष झाले,मात्र येत्या 31 मार्च रोजी लातूर येथे रेल्वे डब्यांची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा  शुभारंभ मी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार असून त्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 गेल्या 70 वर्षात मुंबईचा जो विकास झाला नाही तो 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे होणार आहे.मुंबईच्या विकासासाठी अर्थसंकल्पात 54777 कोटींची आरथिक तरतूद केल्यामुळे भविष्यात मुंबईचा सर्वांगिण विकास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या मराठवाड्या कडे दुर्लक्ष झाले,मात्र येत्या 31 मार्च रोजी लातूर येथे रेल्वे डब्यांची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा  शुभारंभ मी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार असून त्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास  त्यांनी व्यक्त केला.
यावेळी 1979 ते 87 पर्यंत 8 वर्षे आपण रेलवेने दादरला गाडी बदलून चर्चगेटला जायचो या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत,मात्र ते दिल्लीत अण्णा हजारे यांचे उपोषण सुटण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेले होते,आणि इमानदार फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे अण्णा हजारे यांचे उपोषण सुटले हा महाराष्ट्रासाठी मोठा बहुमान असल्याचे गौरवोद्गार पियुश गोयल यांनी काढले.

तत्पूर्वी शिवसेनेच्या बहिष्कार व घोषणाबाजी मुळे या उदघाटन सोहळ्याला गालबोट लागले.शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद व आमदार सुनील प्रभू (कॅबिनेट दर्जा) यांचे व आमदार तृप्ती सावंत याचे नावच रेल्वेच्या कार्यक्रम पत्रिकेत नव्हते.त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.त्यामुळे आपण या विरोधात हक्क भंग आणू अशी माहिती आमदार प्रभू यांनी दिली.
महिला विभाग संघटक व नगरसेविका साधना माने यांनी याबाबतीत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले.उद्योग मंत्री सुभाष देसाई तर निघून गेले,तर खासदार गजानन कीर्तिकर यांनी देखिल बहिष्कार टाकला.

लोकमतने उदघाटनाच्या वेळी घोषणाबाजी व गोंधळ होणार आणि परत 16 डिसेंबर 2016 रोजी राम मंदिर रेल्वे स्थांनक उदघाटनाची पुनरावृत्तीे होणार असे बुधवारी आणि मंगळवारी ऑनलाइन लोकमतवर दिलेले वृत्त खरे ठरले अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी व्यक्त केली.
यावेळी मंचकावर खासदार गोपाळ शेट्टी,महिला व बाल कल्याण राज्यमंत्री व गोरेगावच्या आमदार विद्या ठाकूर,राज्यमंत्री रवींद्र चव्हाण,आमदार अमित साटम,आमदार प्रशांत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Mumbaikar's journey will be canceled, soon the AC machinery will be in the 70 local trains - Piyush Goyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.