Mumbai Rain Live Updates: कल्याण-बदलापूर रेल्वे वाहतूक अद्याप ठप्प, महालक्ष्मी एक्स्प्रेस घटनास्थळीच उभी

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 07:47 PM2019-07-26T19:47:12+5:302019-07-27T22:52:50+5:30

सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीचा खोळंबा

mumbai rain live updates heavy rainfall in city imd predicts flooding local trains traffic affected | Mumbai Rain Live Updates: कल्याण-बदलापूर रेल्वे वाहतूक अद्याप ठप्प, महालक्ष्मी एक्स्प्रेस घटनास्थळीच उभी

Mumbai Rain Live Updates: कल्याण-बदलापूर रेल्वे वाहतूक अद्याप ठप्प, महालक्ष्मी एक्स्प्रेस घटनास्थळीच उभी

Next

मुंबई: शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शहर आणि उपनगरातील सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाल्यानं काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. भांडूप, अंधेरी, दादर, हिंदमाता, वांद्रे, माटुंगा, वडाळा, चर्चगेट या भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे.

 

LIVE

Get Latest Updates

11:36 PM

रेल्वे प्रशासनावर संताप तर एनडीआरएफवर स्तुतिसुमने

10:57 PM

कल्याणमध्ये पावसात अडकलेल्या नागरिकांची मदत करताना एनडीआरएफची टीम

10:49 PM

रायगड येथील निखोपमधील फार्म हाऊसमध्ये पावसामुळे अडकलेल्या पाच जणांना स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी वाचवले.

07:10 PM

बदलापूर : महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका झाल्यानंतर त्यांना विशेष लोकलने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पाठवण्यात आले.

05:18 PM

कल्याण: पावसामुळे येथील इमारतीत अडकलेल्या 9 लोकांना आयएएफ हेलिकॉप्टरने वाचविले. 

04:52 PM

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये पूरस्थिती

04:09 PM

1 हजार 50 प्रवाशांची सुखरुप सुटका

महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील 1 हजार 50 प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

04:09 PM

विशेष कल्याण लोकल सोडण्यात येणार

डोंबविली: बदलापूर स्थानकातून 16 तासानंतर दुपारी 4.20 च्या सुमारास विशेष कल्याण लोकल सोडण्यात येणार आहे, या लोकलमध्ये महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेले प्रवासी असून ते कल्याणला उतरतील तेथून विशेष गाडीने मनमाड दौंड मार्गे कोल्हापूर जाणार असल्याचे सांगण्यात आले

03:05 PM

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी पोहचविण्यात यश

02:51 PM

42 गावांचा संपर्क तुटला

भिवंडी : वाशिंदचा रेल्वेखालचा बोगदा पाण्याखाली; गेरसे, कोसला, काकारपाडा, पलसोली, शेरे, अंबरजे, उशीद, हाल, फळेगाव, दहागाव, खातीवली, वासिंद, भातसईसह 42 गावांचा संपर्क तुटला.
 

 

01:52 PM

डोंबिवली: पावसाचा तासभर झाला वेग कमी असून संतत धार सुरु

डोंबिवली:  गरज असेल तर घराबाहेर पडा, तसेच सुरक्षित ठिकाणी राहा, रिक्षा फिरवून महापालिकेचे नागरिकांना आवाहन 

 

01:44 PM

कल्याणजवळील म्हारळ गावात बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम दाखल

कल्याण - म्हारळ गावात बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम दाखल

01:41 PM

पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत

01:39 PM

ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीच्या काही भागात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई - हवामान खात्याकडून ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीच्या काही भागात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा  

01:36 PM

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या 9 गर्भवती महिलांनी सुरक्षित स्थळी हलवले

वांगणी - महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या 9 गर्भवती महिलांनी सुरक्षित स्थळी हलवले,  उपचारांसाठी  37 डॉक्टर तैनात 

01:17 PM

महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून 500 जणांची सुटका

01:06 PM

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकल्या नऊ गर्भवती महिला

वांगणी - महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकल्या नऊ गर्भवती महिला, बचावकार्य युद्धपातळीवर 

12:55 PM

महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या बचावकार्यावर लक्ष ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिवांना आदेश

12:45 PM

महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या 220 प्रवाशांची सुटका

12:38 PM

महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या बचावकार्यावर लक्ष ठेवण्यासाठी मध्य रेल्वेचे डीआरएम, एडीआरएम, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

वांगणी - महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या बचावकार्यावर लक्ष ठेवण्यासाठी मध्य रेल्वेचे डीआरएम, एडीआरएम, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

12:23 PM

रेल्वे प्रशासनाकडून महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना आवाहन

12:15 PM

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आणले सुरक्षित ठिकाणी

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आणले सुरक्षित ठिकाणी 

12:13 PM

अतिवृष्टीमुळे कल्याण-मुरबाड रस्त्यावर किशोर,वांजळे,पोटगाव येथे पाणी भरले

कल्याण - अतिवृष्टीमुळे कल्याण-मुरबाड रस्त्यावर किशोर,वांजळे,पोटगाव येथे पाणी भरले 

12:03 PM

महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून 117 प्रवाशांची सुटका

11:42 AM

पुरामुळे वांगणी येथे खोळंबलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकले एक हजार प्रवासी

बदलापूर - पुरामुळे वांगणी येथे खोळंबलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकले एक हजार प्रवासी,  720 प्रवासी सामान्य तर 300 प्रवासी एसी डब्यातून प्रवास करत होते

11:16 AM

महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून 8 जणांची सुटका

वांगणी - बदलापूर आणि वांगणीदरम्यान अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून आठ जणांची सुटका 

11:08 AM

महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर रवाना

बदलापूर - महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या मदतीसाठी हवाई दलाचे हेलिकॉप्टर रवाना 

11:08 AM

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी बचावकार्य सुरू

वांगणी -  पुरामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी नौदलाची ८ बचाव पथकं, ३ पाणबुड्यांचे पथके आणि एक सी किंग हेलिकॉप्टर रवाना

10:51 AM

पुरामुळे वांगणी येथे खोळंबलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकले एक हजार प्रवासी

बदलापूर - पुरामुळे वांगणी येथे खोळंबलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकले एक हजार प्रवासी,  720 प्रवासी सामान्य तर 300 प्रवासी एसी डब्यातून प्रवास करत होते

10:10 AM

डोंबिवलीत पावसाचा जोर ओसरला, जनजीवन हळुहळू पूर्वपदावर

डोंबिवली: पावसाचा जोर ओसरला, जनजीवन हळुहळू पूर्वपदावर

10:09 AM

कल्याण - मुसळधार पावसामुळे पेट्रोलपंप पाण्याखाली

कल्याण - मुसळधार पावसामुळे पेट्रोलपंप पाण्याखाली, 100 जण अडकले 

10:07 AM

वांगणी-बदलापूर दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना काढण्यासाठी मदतकार्य सुरू

बदलापूर - वांगणी-बदलापूर दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना काढण्यासाठी मदतकार्य सुरू, NDRF ची टीम घटनास्थळी, हेलिकॉप्टर देखील मागवले, प्रवाशांच्या मदतीसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येत आहे, अंबरनाथ तहसीलदार देशमुख घटनास्थळी

09:55 AM

वालधुनी नदीला पूर आल्याने कल्याणजवळील अनेक वस्त्यांमध्ये शिरले पाणी

09:50 AM

कल्याण - नगर महामार्गावरील वाहतूक बंद

कल्याण - उल्हास नदीवरील रायता पूल पाण्याखाली गेल्याने कल्याण - नगर महामार्गावरील वाहतूक बंद  

09:49 AM

उल्हास नदीला पूर आल्यामुळे मोहिली येथील पाणी पंपगृह बंद

डोंबिवली: मोहिली येथील पाणी पंपगृह उल्हास नदीला पूर आल्यामुळे बंद, कल्याण डोंबिवलीचा संपूर्ण पाणी पुरवठा बंद आहे

09:49 AM

बारवी धरण 82 टक्के भरले

ठाणे : बारवी धरण 82 टक्के भरले, रात्रभरात दोन मिटर पाण्याची पातळी वाढली तर धरणात रात्रभरात 356 मिमी पाऊस पडला

09:48 AM

ठाणे जिल्ह्यात 240 मिमी मुसळधार पाऊस

ठाणे : जिल्ह्यात 240 मिमी मुसळधार पाऊस, सर्वाधिक मुरबाड तालुक्यात 332 मिमी, उल्हासनगर 296 तर अंबरनाथ ला 280 मिमी पावसाची नोंद

09:47 AM

टिटवाळा रेल्वेस्थानक ते गणपती मंदिर या मुख्य रस्त्यावर पाणी

टिटवाळा - टिटवाळा रेल्वेस्थानक ते गणपती मंदिर या मुख्य रस्त्यावर बाजारपेठेत, दुकानात, घरात शिरले पाणी

09:20 AM

पुणे-मुंबई मार्गावर दरड कोसळली, वाहतूक ठप्प

पुणे-मुंबई मार्गावर दरड कोसळली, वाहतूक ठप्प, चेन्नई एक्स्प्रेस ठाकूरवाडी येथून वळवली

09:13 AM

मुसळधार पावसामुळे सायन परिसरात साचले पाणी

09:01 AM

मुसळधार पावसामुळे अंबरानाथमधील ऐतिहासिक शिवमंदिर परिसर जलमय

अंबरनाथ - मुसळधार पावसामुळे अंबरानाथमधील ऐतिहासिक शिवमंदिर परिसर जलमय, शिवमंदिरातही शिरले पाणी 

08:33 AM

मुसळधार पावसामुळे मुंबईतील चेंबूर परिसरात साठले पाणी

08:32 AM

पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस पनवेल स्थानकात थांबवली

पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस पनवेल स्थानकात थांबवली, तसेच 27 जुलै रोजी सुटणारी पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस आणि 29 जुलै रोजी सुटणारी एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस रद्द

08:27 AM

मुंबई विमानतळावरून विमानांची वाहतूक सुरळीतपणे सुरू

08:09 AM

बदलापूर आणि वांगणी स्थानकांदरम्यान अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या मदतीसाठी एनडीआरएफला पाचारण

07:53 AM

गेल्या 24 तासांत मुंबई आणि उपनगरात 150 ते 180 मिमी पाऊस, येत्या दिवसभरातही मुसळधार पावसाचा इशारा

07:43 AM

मुंबईतील मुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीला फटका, सात विमाने रद्द, 8 ते 9 विमानांचा मार्ग बदलला

07:42 AM

महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी स्थानकात अडकली

कोल्हापूरहून मुंबईकडे येणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी स्थानकात अडकली. वांगणीजवळ रेल्वे रुळांवर सुमारे दोन फूट पाणी 

 

06:45 AM

गांधी मार्केट परिसरात साचलं पाणी

मुंबईतील सायन येथील गांधी मार्केट परिसरात पावसामुळे पाणी साचलं आहे. 

06:43 AM

परिस्थिती पाहून शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय मुख्याध्यापकांनी घ्यावा - आशिष शेलार

शहरात पडणारा पाऊस लक्षात घेता प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी सुट्टी देण्याचा निर्णय त्यांच्या पातळीवर घेऊ शकतात अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी दिल्या आहेत. 

06:28 AM

कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प

अंबरनाथ, बदलापूरमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वांगणीदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प आहे. 

10:53 PM

बदलापूरात रेल्वे रुळांवर साचलं पाणी

10:22 PM

अनेक भागांमध्ये पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम

10:07 PM

मढ-मार्वे रोडवर झाड पडल्याने वाहतूक कोंडी

09:34 PM

डोंबिवली शहरात तासाभरापासून प्रचंड पाऊस

09:28 PM

सी. पी. टँक परिसरात असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा काही भाग कोसळला

09:26 PM

आंतरराष्ट्रीय विमानतळाला पावसाचा फटका

09:25 PM

पाणी साचलेल्या भागांमध्ये, समुद्राजवळ जाऊ नका; मुंबई पोलिसांचं आवाहन

09:24 PM

पुढील ४८ तास मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज

08:57 PM

ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक ५ मिनिटं उशिरानं

08:57 PM

पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर भागात वाहतूककोंडी
 

08:16 PM

मुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीला फटका

08:09 PM

दिवसभरात पश्चिम उपनगरात ४६ मिमी, पूर्व उपनगरात ५८ मिमी, तर शहरात ३८ मिमी पाऊस
 

08:05 PM

अंधेरीतील सबवे बंद; भांडूपमधील एलबीएस मार्गावर पाणी साचलं
 

08:03 PM

मध्य रेल्वेची सेवा 10 ते 15 मिनिटं उशिरानं, हार्बर 10 मिनिटं विलंबानं, पश्चिम रेल्वे सुरळीत
 

07:55 PM

येत्या ४ तासांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस- हवामान विभाग

Web Title: mumbai rain live updates heavy rainfall in city imd predicts flooding local trains traffic affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.