मुंबई घरफोड्यांच्या रडारवर; अब्जावधी रुपयांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 04:50 AM2018-07-24T04:50:54+5:302018-07-24T04:51:19+5:30

पाच वर्षांमध्ये तब्बल १४ हजार ८८३ घरे फोडली, माहिती अधिकारात उघड

Mumbai home-based radar; Loot of billions of rupees | मुंबई घरफोड्यांच्या रडारवर; अब्जावधी रुपयांची लूट

मुंबई घरफोड्यांच्या रडारवर; अब्जावधी रुपयांची लूट

Next

मुंबई : मुंबईत गेल्या पाच वर्षांत दोन अब्ज ७७ कोटी ६२ लाख ३६ हजार रुपये किमतीच्या घरफोडी करण्यात आल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात लूटमार झाली असताना, मुंबई पोलिसांना आतापर्यंत केवळ ४८ कोटी ७० लाख ३८ हजार रुपयांचीच मालमत्ता हस्तगत करण्यात यश आल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.
सर्वात जास्त सुरक्षित शहरांत मुंबईचे नाव अग्रक्रमावर आहे. मात्र, याच मुंबईत सुरक्षिततेच्या दृष्टीने २०१६ साली ९४९ कोटी रुपये खर्च करून ६ हजार कॅमेरे लावण्यात आले. तरीही गुन्ह्यांना रोख लावण्यात आणि त्यांचा तपास करण्यात पोलिसांना म्हणावे तितके यश मिळत नसल्याचे दिसत आहे. पाच वर्षांत दोन अब्ज ७७ कोटी ६२ लाख ३६ हजार ०७८ रुपये किमतीच्या मालमत्ता आणि रोख घरफोडीत चोरी झाली आहे. तर याउलट घरफोडीत चोरी झालेल्या ऐवजाच्या २० टक्के रक्कम जमा करण्यातही पोलिसांना यश आलेले नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीत ही माहिती दिली असून, त्यांनी पोलिसांच्या या कामगिरीवर संशय व्यक्त केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीत ही माहिती उघडकीस आली आहे.
शेख यांनी २०१३ सालापासून मे २०१८ सालापर्यंत मुंबईत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांची माहिती मुंबई पोलिसांना विचारली होती, तसेच या घरफोडींमध्ये किती किमतीच्या मालमत्ता किंवा रोेख चोरी झाली आणि त्यातील पोलिसांनी किती किमतीच्या मालमत्ता किंवा रोख हस्तगत केले, याचीही विचारणा त्यांनी केली होती.
त्यावर बृहन्मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे शासकीय माहिती अधिकारी आणि सहायक पोलीस आयुक्त (प्रतिबंधक) जनार्दन थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत १ जानेवारी २०१३ पासून मे २०१८ सालापर्यंत एकूण १४ हजार ८८३ घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्यात २ अब्ज ७७ कोटी ६२ लाख ३६ हजार ०७८ रुपये इतक्या किमतीच्या ऐवज आणि रोख चोरीला गेल्या आहेत. यातील केवळ १७.५ टक्के ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

आतापर्यंत केवळ १७.५ टक्के ऐवज पोलिसांकडून हस्तगत
पाच वर्षांत घरफोडीत २ अब्ज ७७ कोटी ६२ लाख ३६ हजार ०७८ रुपये इतक्या किमतीच्या ऐवजासह रोख रक्कम चोरीस गेली आहे. यातील पोलिसांनी फक्त ४८ कोटी ७० लाख ३८ हजार १५२ रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. याचाच अर्थ केवळ १७.५ टक्के ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Web Title: Mumbai home-based radar; Loot of billions of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.