मुंबई : मानखुर्द-मंडाळा भागातील ६३ गोदामांवर निष्कासन कारवाई,महापालिकेच्या 'एम पूर्व'विभागाची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 03:23 PM2018-02-15T15:23:17+5:302018-02-15T15:24:33+5:30

महापालिकेच्या 'एम पूर्व'विभागातील मानखुर्द–मंडाळा या खाडीलगत असलेल्या भूभागावर भंगार मालाची ६३ अनधिकृत गोदामे उद्भवली होती.

Mumbai: Execution proceedings on 63 warehouses in Mankhurd-Mandalay area, action against Municipal Corporation's 'M-East' | मुंबई : मानखुर्द-मंडाळा भागातील ६३ गोदामांवर निष्कासन कारवाई,महापालिकेच्या 'एम पूर्व'विभागाची धडक कारवाई

मुंबई : मानखुर्द-मंडाळा भागातील ६३ गोदामांवर निष्कासन कारवाई,महापालिकेच्या 'एम पूर्व'विभागाची धडक कारवाई

Next

मुंबई : महापालिकेच्या 'एम पूर्व'विभागातील मानखुर्द – मंडाळा या खाडीलगत असलेल्या भूभागावर भंगार मालाची ६३ अनधिकृत गोदामे उद्भवली होती. हे सर्व अनधिकृत गोदामे महापालिकेच्या 'एम पूर्व'विभागाद्वारे नुकत्याच करण्यात आलेल्या धडक कारवाईदरम्यान तोडण्यात आली आहेत. शिवाय,येथील ६ आस्थापनांवर पोलीसात गुन्हे(FIR) नोंदविण्यात आले असून, १९ आस्थापनांचे पाणी व वीजेची जोडणी खंडित करण्यात आली आहे, अशी माहिती एम/पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त  श्रीनिवास किलजे यांनी दिली आहे. या कारवाईमुळे या भागातील भंगार मालाला आग लागण्याचे प्रकार नियंत्रणात आणण्यास मदत होईल, अशीही माहिती किलजे यांनी दिली. 

महापालिकेच्या परिमंडळ – ५ चे उपायुक्त  भारत मराठे यांच्या मार्गदर्शनानुसार'एम पूर्व' विभागाद्वारे नुकत्याच करण्यात आलेल्या या कारवाईत महापालिकेच्या'एम पूर्व' विभागाचे ५० कामगार – कर्मचारी - अधिकारी सहभागी झाले होते.तसेच संबंधित पोलीस ठाण्याचे १७ पोलीस कर्मचारी - अधिकारी यांच्या मदतीने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडण्यात आली. या कारवाईसाठी ५जेसीबी, ६ डंपर यासह इतर आवश्यक वाहने व साधनसामुग्री वापरण्यात आली,अशीही माहिती किलजे यांनी दिली आहे.

Web Title: Mumbai: Execution proceedings on 63 warehouses in Mankhurd-Mandalay area, action against Municipal Corporation's 'M-East'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.