चित्रपट समीक्षा दुर्लभ होत आहे - अमोल पालेकर

By admin | Published: April 25, 2017 01:52 AM2017-04-25T01:52:37+5:302017-04-25T01:52:37+5:30

‘आजच्या काळात चित्रपटावरील चांगली समीक्षा कुठेही वाचण्यास मिळत नाही. आज जे चित्रपट परीक्षण लिहिले जाते, त्यामध्ये

Movie review is getting rare - Amol Palekar | चित्रपट समीक्षा दुर्लभ होत आहे - अमोल पालेकर

चित्रपट समीक्षा दुर्लभ होत आहे - अमोल पालेकर

Next

मुंबई : ‘आजच्या काळात चित्रपटावरील चांगली समीक्षा कुठेही वाचण्यास मिळत नाही. आज जे चित्रपट परीक्षण लिहिले जाते, त्यामध्ये अधिकतर चित्रपटाची प्रसिद्धीच केली जाते, असेच वाटते. त्यात चिकित्सक दृष्टीने केलेले परीक्षण आढळत नाही. आजची तरुणाई कोणत्याही कलाकृतीवर लाइक-अनलाइक एवढेच म्हणते, पण दीर्घ विचार व्यक्त करत नाही. चित्रपट आवडला किंवा नाही आवडला, यावर विचार मांडणे आवश्यक आहे. मात्र, ते आज होताना दिसत नाही. पूर्वी आम्ही एका कॉफी कपसोबत तासन्तास चर्चा करायचो. या कट्ट्याच्या माध्यमातून अशा प्रकारच्या विचारांची देवाण घेवाण झाली पाहिजे,’ असे मत ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केले.
भायखळा येथील डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय आयोजित ‘म्युझियम कट्टा’ उपक्रमांतर्गत रविवारी अभिनेता अमोल पालेकर यांनी मराठी चित्रपटाचा बदलता प्रवास उलगडून दाखवला. काळानुरूप चित्रपटाचे तंत्रज्ञान बदलेले असून, आज आपण डिजिटल व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीमध्ये गेलो. याचा फायदा आजच्या पिढीला मिळाला. आजची पिढी मुक्तपणे आपली कलाकृती बनवत आहे. तांत्रिकदृष्ट्या मराठी चित्रपट कुठेही मागे पडला नाही, असे पालेकर यांनी सांगितले. धंदेवाईक मराठी चित्रपट नवी समीकरण घेऊन पचवून, मराठी सिनेमा कुठेही न थांबता पुढे जात आहे. याचे उदाहरण म्हणजे, ‘सैराट’, ‘नटसम्राट’ या सारखे चित्रपट होय. धंदेवाईक चित्रपटांच्या प्रवासात मराठी चित्रपट कमी पडत नाही, असे ठाम मत पालेकर यांनी मांडले.
‘चित्रपट वितरण प्रणाली मराठीमध्ये कधीच नव्हती. ही प्रणाली हिंदीत आहे, पण झी टॉकिजने मराठीमध्ये वितरण प्रणालीची एक वाट दाखवून दिली आहे. ‘झी’ने अनेक चित्रपटांना या वाटेमधून मोठे केले. मराठी चित्रपट वितरण प्रणाली विकसित झाली पाहिजे,’ असे पालेकर म्हणाले. ‘माझी कलाकृती प्रेक्षकांपर्यंत नेण्यासाठी मी जर १० पावले पुढे टाकत असेन, तर प्रेक्षकांनाही २ पावले पुढे आले पाहिजे,’ अशी अपेक्षा पालेकर यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Movie review is getting rare - Amol Palekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.