मनसेने वाढवल्या मनोज कोटक यांच्या अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:45 AM2019-04-11T00:45:45+5:302019-04-11T00:45:47+5:30

भाजपचे वर्चस्व मोडीत काढण्याचे पाटीलांसमोर आव्हान

MNS raised the problems of Manoj Kotak | मनसेने वाढवल्या मनोज कोटक यांच्या अडचणी

मनसेने वाढवल्या मनोज कोटक यांच्या अडचणी

Next

उत्तर पूर्व मुंबईत आघाडीकडून संजय पाटील निवडणूकीच्या रिंगणात आहेत. २०१४ मध्ये त्यांचा मोदी लाटेत पराभव झाला होता. यंदा त्यांच्याविरुद्ध भाजपचे मनोज कोटक आहेत. ईशान्य मुंबईत भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे चेहरा जरी नवीन असला तरी, हे वर्चस्व मोडीत काढून विजय मिळविण्याचे आव्हान पाटील यांच्यासमोर आहे. त्यात, शिवसेना भाजप अंतर्गत वाद, मतांचे विभाजन याचाही ते पुरेपुर फायदा करुन घेत आहेत. तळागाळातील मतदारापर्यंत पोहचून ते, प्रचाराला लागले आहेत. ईशान्य मुंबईत मराठी मतदार सर्वाधिक आहेत. यात, आता मनसेलाही सोबत घेत प्रचाराला सुरुवात केली आहे.

उत्तर पूर्व मुंबईत विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कट करत, नगरसेवक मनोज कोटक यांना संधी मिळाली. २०१७मध्ये पालिका निवडणुकीत ते तिसऱ्यांदा मुलुंडमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. २०१४मध्ये भांडुपमधून सेनेविरुद्ध आमदारकीच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. यंदा थेट खासदारकीसाठी संधी मिळाल्यामुळे त्यांच्यावरही जबाबदारीचे ओझे आहेच. त्यानुसार, शक्तिप्रदर्शन करत ते पाटील यांना टक्कर देत आहे. मात्र, जनता कुणाची निवड करणार, याची धाकधूक दोघांनाही आहे.

यंदाचे आव्हान कसे आहे ?
मोदींची लाट नाही. त्यात, भाजप पक्षाचा विद्यमान खासदारावरच विश्वास नव्हता. म्हणून, त्यांनी नवीन चेहरा दिला. दिला तर कोण दिला? त्यामुळे आव्हानाचा प्रश्न नाही. कार्यकर्ते काम करत आहेत. त्यामुळे अभी तो शुरुवात है.. आगे आगे देखो होता है क्या. त्यांना आतापासून गुंडाना घेवून प्रचार करावा लागत आहे. त्यामुळे ते कुठल्या दिशेने प्रचार करत आहेत हे देखील पहावयास मिळत आहे.

भाजप उमेदवाराच्या प्रचाराबाबत काय म्हणाल?
भाजपकडून गुंडाना सोबत घेवून निवडणूक लढविली जात आहे. त्यामुळे त्यांचा प्रचार कसा सुरु आहे हे त्यावरुनच समजते. कितीही काही केले तरी, निवडणुकीच्या निकालातच त्यांना उत्तर मिळेल.

पक्षाकडून मिळालेल्या संधीबाबत काय म्हणाल?
ईशान्य मुंबईत खासदार किरीट सोमय्यांचा कार्याचा ठसा आहे. त्यात, पक्षाने मला जी जबाबदारी दिली आहे. ती सोमय्यांच्या सहकार्याने पार पाडू. त्यानुसार, आम्ही सगळेच काम करत आहोत.

समस्या सुटलेल्या नाहीत; यावर काय म्हणाल?
विद्यमान खासदारांनी येथील समस्यांना केंद्रापर्यंत पोहचवत कामे मार्गी लावले. रेल्वेच्या फलाटाच्या उंचीच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका केली. त्यामुळे काम, विकास होत आहे. तो होत राहणार. मी निवडून आलो तर यापुढेही अधिक जोमाने काम करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेऩ

प्रचाराची रणनिती कशी आहे?
प्रचारादरम्यान गाडीतून न फिरता, थेट रस्त्यावर उतरुन नागरिकांच्या गाठभेट घेत आहोत. सुरुवातीला त्यांचे प्रश्न जाणून घेत, त्याच्या नोंदी करत आहोत. त्यानुसार, सर्व मतदारांपर्यंत आमचे मुद्दे पोहचविण्याचा प्रयत्न करत आहोत. कार्यकर्ते, पदाधिकारी उत्साहाने काम करत आहेत. सगळेच जण मदतीला आहेत.
सेना-भाजपमधील अंतर्गत वादाचा परिणाम होईल का?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयानंतर युतीचे सगळेच कार्यकर्ते जोमाने, उत्साहाने कामाला लागले आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर, आम्ही एकत्र प्रचाराला लागलो आहोत. त्याच उत्साहाने, जनतेचे प्रश्न मार्गी लावत होतो, आणि पुढेही लावणार आहोत.
कुठल्या प्रमुख समस्यांना प्राधान्य
ईशान्य मुंबईत मुलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यात, प्रामुख्याने आरोग्य केंद्रांकडे भर असेन. रस्ते, डंम्पिग ग्राऊण्ड बरोबरच पुनर्विकासाच्या मुद्यावर प्रयत्न करणार आहोत. नागरिकांच्या समस्या जाणून घेत, त्यानुसार ते मार्गी लागेल़


मुख्य धोरण काय आहे?
ईशान्य मुंबईतील जीवनस्तर अधिकाअधिक सुखकर, आणि सोयीस्कर होईल त्या दिशेने प्रयत्न करणार आहोता. विद्यमान खासदारांनी केलेल्या कामांना गती देण. ईशान्य मुंबईसह मुंबईचा विकास करणे हे मुख्य धोरण आहे.

Web Title: MNS raised the problems of Manoj Kotak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.