सुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 17:43 IST2018-11-20T17:41:01+5:302018-11-20T17:43:21+5:30
कॉमिक बुक संस्कृतीचा चेहरा असलेल्या स्टॅन ली यांना राज ठाकरेंची आदरांजली

सुपरहिरोंचे निर्माते स्टॅन ली यांना राज ठाकरेंची व्यंगचित्रातून श्रद्धांजली
मुंबई: मार्व्हल कॉमिक्सचे जनक स्टॅन ली यांना मनसे प्रमुख राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून आदरांजली वाहिली आहे. स्टॅन ली यांनी स्पायडर मॅन, हल्क यांच्यासारख्या सुपरहिरोंची निर्मिती केली. त्यांनी आठवड्याभरापूर्वी वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. स्टॅन ली जगाचा निरोप घेत असतानाच व्यंगचित्र राज यांनी त्यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर शेअर केलं आहे.
‘मार्व्हल कॉमिक्सचं’ अद्भुत विश्व निर्माण करणारे ‘स्टॅन ली‘ ह्यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या स्मृतीस माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आदरांजली. pic.twitter.com/9g26aVJ7X6
— Raj Thackeray (@RajThackeray) November 20, 2018
अमेरिकेतील कॉमिक बुक संस्कृतीचा चेहरा मानल्या जाणाऱ्या स्टॅन ली यांनी 13 नोव्हेंबरला अखेरचा श्वास घेतला. त्याआधी अनेक दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. त्यांना राज यांनी व्यंगचित्रातून आदरांजली वाहिली. राज यांनी व्यंगचित्रातून ली जगाला अलविदा म्हणताना दाखवले आहेत. यामध्ये ली यांनी निर्माण केलेले सुपरहिरो पृथ्वीवर दिसत आहेत. 'माझ्या सुपरहीरोंनो, येतो मी. माझ्या पृथ्वीला सांभाळा,' असं म्हणत ली जगाचा निरोप घेताना दिसत आहेत.