सफाई कर्मचाऱ्यांची 'मनसे' इच्छा पूर्ण; राज ठाकरेंनी काढला फोटो

By कुणाल गवाणकर | Published: November 15, 2020 12:06 PM2020-11-15T12:06:12+5:302020-11-15T12:08:54+5:30

शिवाजी पार्कात राज ठाकरेंनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत काढला फोटो

mns chief raj thackeray clicks photo with sweeper staff of bmc | सफाई कर्मचाऱ्यांची 'मनसे' इच्छा पूर्ण; राज ठाकरेंनी काढला फोटो

सफाई कर्मचाऱ्यांची 'मनसे' इच्छा पूर्ण; राज ठाकरेंनी काढला फोटो

Next

मुंबई: कोरोना लॉकडाऊन काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अनेकदा चर्चेत राहिले. अनेक जण त्यांच्या मागण्या घेऊन राज ठाकरेंकडे गेले. विशेष म्हणजे राज यांच्याकडे मागण्या घेऊन गेल्यानंतर काही दिवसांनंतर शिष्टमंडळांचे प्रश्न मार्गीदेखील लागले. काही दिवसांपूर्वीच राज यांचा टेनिस कोर्टवरील एक फोटो व्हायरल झाला. यानंतर आता राज यांच्या आणखी एका फोटोची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

मनसेचा नवा झेंडा नॉनव्हेज हॉटेलमध्ये दिसला; मनसैनिकांनी मालकाला चोपला

मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे शिवाजी पार्कात टेनिस खेळायला गेले असताना मुंबई महापालिकेचे सफाई कामगार त्यांच्याकडे आले. त्यांनी राज यांच्याकडे फोटो काढण्याची विनंती केली. राज यांनी त्यांच्या विनंतीला मान देत सफाई कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढला. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाला. कोरोना काळात सफाई कर्मचाऱ्यांनी अतिशय मोलाची बजावली आहे.

राज, आपकी हिंदी इतनी अच्छी कैसी है?; राज्यपालांच्या प्रश्नाला राज ठाकरेंचं मजेशीर उत्तर

गाऱ्हाणं मांडण्यासाठी अनेकजण कृष्णकुंजवर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं अनेक गोष्टींवर निर्बंध आणले. त्याचा फटका लाखो लोकांना बसला. या काळात अनेकांनी कृष्णकुंजवर येऊन त्यांची गाऱ्हाणी राज यांच्याकडे मांडली. वारकरी, कोळी बांधव, ब्रास बँड पथक, आयटीआय शिक्षक, ग्रंथालय कर्मचारी, डबेवाल्यांनी राज यांच्याकडे त्यांच्या समस्या मांडल्या. राज यांनी गेल्या महिन्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी वाढीव वीजबिल आणि दूध दराचा मुद्दा उपस्थित केला होता.

Web Title: mns chief raj thackeray clicks photo with sweeper staff of bmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.