मेट्रो झाली ‘कोट्यधीश’!, नोव्हेंबरमधील आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 07:19 AM2017-12-02T07:19:39+5:302017-12-02T07:19:42+5:30

वातानुकूलित प्रवासाचे स्वप्न पूर्ण करणाºया मेट्रोच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. नोव्हेंबर महिन्यात तब्बल एक कोटी प्रवाशांनी मुंबई मेट्रोने प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.

 Metro gets 'Quoted!', Statistics from November | मेट्रो झाली ‘कोट्यधीश’!, नोव्हेंबरमधील आकडेवारी

मेट्रो झाली ‘कोट्यधीश’!, नोव्हेंबरमधील आकडेवारी

googlenewsNext

मुंबई : वातानुकूलित प्रवासाचे स्वप्न पूर्ण करणाºया मेट्रोच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. नोव्हेंबर महिन्यात तब्बल एक कोटी प्रवाशांनी मुंबई मेट्रोने प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. ‘मुंबई मेट्रो वन’ने घाटकोपर-अंधेरी-वर्सोवादरम्यान १० हजार ६०६ मेट्रो फेºया चालवल्या. यातून १ कोटी २ लाख ५७ हजार ५७ प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती मेट्रो प्रवक्त्यांनी दिली आहे. या महिन्यात मेट्रोच्या फेºयांनीदेखील ९९ टक्के वक्तशीरपणाचे पालन केल्याचा दावा मुंबई मेट्रोच्या प्रवक्त्यांनी केला आहे.
कमीतकमी वेळात वातानुकूलित प्रवास करणारी वाहतूक यंत्रणा म्हणून मुंबई मेट्रो नावारूपास आली. घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मार्गावर ही सेवा सुरू झाल्यामुळे उपनगरीय रेल्वेवरील ताण काही प्रमाणात कमी झाला. मेट्रोच्या प्रवासामुळे दादर स्थानकातील सर्वाधिक भार कमी झाला आहे. घाटकोपर येथून अंधेरीला जाण्यासाठी रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. परिणामी, रेल्वे मार्ग सोईस्कर ठरत असल्याने सर्वाधिक प्रवासी ताण दादर स्थानकांवर येत होता. मुंबई मेट्रोमुळे हा ताण कमी झाला आहे. २०१५ साली नोव्हेंबर महिन्यात ७० लाख ६७ हजार ७७५ प्रवाशांनी प्रवास केला होता. २०१६ साली याच महिन्यात ८४ लाख ९२ हजार ६५० प्रवाशांनी प्रवास केला. यंदा मात्र मेट्रो प्रवाशांनी एक कोटीचा आकडा ओलांडला आहे. नोव्हेंबर २०१७मध्ये एक कोटी २ लाख ५७ हजार ५७ प्रवाशांनी प्रवास केला. ११.४० किलोमीटरच्या घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो मार्गामुळे मुंबईकरांना ९० मिनिटांचा प्रवास अवघ्या २१ मिनिटांत करणे शक्य झाले आहे. वक्तशीरपणा, वातानुकूलित प्रवास आणि प्रवासी सुरक्षा हा प्रमुख उद्देश असल्यामुळे मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात मेट्रो प्रवासाला पसंती दिली. मेट्रोच्या फेºयांमध्ये सातत्य राखल्यामुळे हा टप्पा पार करणे सोपे झाले आहे. दिवसेंदिवस मुंबईकरांना अधिक प्रवासाभिमुख सोई पुरवण्याकडे मुंबई मेट्रोचे लक्ष असेल, असे मुंबई मेट्रो वनच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
 

Web Title:  Metro gets 'Quoted!', Statistics from November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.