Sanjay Raut : "दिल्लीत भेट, तुला एके ४७ ने उडवतो!," खा. संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

By गौरी टेंबकर | Published: April 1, 2023 11:09 AM2023-04-01T11:09:51+5:302023-04-01T11:10:20+5:30

खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून मिळाली धमकी.

Meet in Delhi shiv sena uddhav thackeray group mp Death threat Sanjay Raut lawrense bishnoi | Sanjay Raut : "दिल्लीत भेट, तुला एके ४७ ने उडवतो!," खा. संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

Sanjay Raut : "दिल्लीत भेट, तुला एके ४७ ने उडवतो!," खा. संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

googlenewsNext

मुंबई: खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी व्हॉट्सॲपद्वारे मिळाली आहे."तू दिल्लीमध्ये भेट तुला एके ४७ ने उडवतो, तुझा मूसेवाला करतो तू आणि सलमान फिक्स," अशा आशयाची ही धमकी असून याप्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांना माहिती दिल्याचेही समजते.

या व्हॉट्सॲप मेसेजची दखल घेत राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना कळवले असून पोलीस त्याचा तपास करत आहेत. याआधी राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या जीवाला धोका असल्याची माहिती दिली होती.

बिश्नोई टोळीने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला संपवण्याची धमकीही दिली होती. मार्च २०२२ मध्ये, सलमान खानच्या कार्यालयाला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून वर्षापूर्वी एका काळवीटाची 'हत्या' करून बिश्नोई समुदायाला 'अपमानित' केल्या प्रकरणी धमकी मिळाली.

Web Title: Meet in Delhi shiv sena uddhav thackeray group mp Death threat Sanjay Raut lawrense bishnoi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.