मराठवाडा-विदर्भ समाजाच्या एकजूटीने भारावलो- मेटे

By Admin | Published: March 3, 2015 10:33 PM2015-03-03T22:33:53+5:302015-03-03T22:33:53+5:30

या शहराची ख्याती सातासमुद्रापार असून येथे विदर्भ-मराठवाडा येथील मूळ रहीवाशांची एकजूट बघून भारावल्याची भावना शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी व्यक्त केली.

Marathwada-Vidarbha community united by Bharavalo-Mete | मराठवाडा-विदर्भ समाजाच्या एकजूटीने भारावलो- मेटे

मराठवाडा-विदर्भ समाजाच्या एकजूटीने भारावलो- मेटे

googlenewsNext

डोंबिवली : या शहराची ख्याती सातासमुद्रापार असून येथे विदर्भ-मराठवाडा येथील मूळ रहीवाशांची एकजूट बघून भारावल्याची भावना शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी व्यक्त केली. येथिल मराठवाडा विदर्भ रहिवाशी सेवा संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम शनिवारी - पिंपळेश्वर मैदानाच्या पटांगणात संपन्न झाला.
पावसाच्या वातावरणातही येथे वास्तव्यास असलेल्या हजारो रहीवाशांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून एकमेकांच्या अडीअडचणींसह सुख:दुखाची चर्चा केली, असे एकत्रिकरण फार क्वचितच बघायला मिळते, असेही ते म्हणाले. त्यावेळी व्यासपीठावर भाजपाचे पूर्व मंडल अध्यक्ष शशिकांत कांबळे, जोंधळे समूहाचे शिवाजी जोंधळे, शिवसेनेचे हिंगोली उपजिल्हा प्रमुख रमेश शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख-हिंगोली कडुजी भवर, संघटनेचे येथिल अध्यक्ष दत्ता माळेकर, रामदास टेकाळे, शिवाजी तावरे, प्रकाश शिंगणे, सोहब सुर्यवंशी, प्रभाकर पिंपळे, संजय म्हस्के, कृष्णा काकडे, अनंता डहाळके आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जिजामातेच्या पालखीसह -शोभायात्रेने विदर्भ-मराठवाड्याच्या संस्कृतिचे दर्शन डोंबिवलीकरांना दाखवण्यात आले. याच निमित्ताने माळेकर यांनी आगामी काळात या समाजबांधवांसाठी ‘समाजभवन’ बांधण्यात येणार असून त्यासाठी जागाही बघण्यात येत असल्याचे सांगितले. कांबळे यांनीही अशी एकत्रिकरणे होणे हे संघटीतपणाचे द्योतक असल्याचे मत व्यक्त केले. शिंदे, भवर यांचीही या निमित्ताने भाषणे झाली.

Web Title: Marathwada-Vidarbha community united by Bharavalo-Mete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.