राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वात पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपामुळे मंत्रालयात ना चहा ना पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 05:35 AM2017-09-22T05:35:58+5:302017-09-22T05:36:00+5:30

In the Mantralaya, there is no tea or water due to the two-day strike called by the State Government IV Divisional Central Union | राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वात पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपामुळे मंत्रालयात ना चहा ना पाणी

राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वात पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपामुळे मंत्रालयात ना चहा ना पाणी

Next

मुंबई : राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वात पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपामुळे आज मंत्रालयात अधिकारी व अन्य कर्मचा-यांना चहादेखील मिळू शकला नाही. मंत्रालय कँटिनचे कर्मचारीही संपात सहभागी झाले होते.
चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांच्या संपामुळे एका विभागातून दुस-या विभागात वा माळ्यावर फाईली नेण्यासाठीही चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांची वानवा असल्याने अडचणी येत होत्या. हा संप बेकायदेशीर असल्याचे सांगत संपात सहभागी न होण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. संपात सहभागी होणाºयांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही सरकारने दिला आहे
>राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने गुरुवारी, शुक्रवारी दोन दिवसीय संप पुकारला आहे.

Web Title: In the Mantralaya, there is no tea or water due to the two-day strike called by the State Government IV Divisional Central Union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.