वडाळा, भायखळ्याच्या पुढे धिम्या मार्गावरील लोकल सेवा उद्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 06:01 AM2018-12-01T06:01:41+5:302018-12-01T11:58:07+5:30

मध्य रेल्वेच्या मशीद स्थानकातील पादचारी पूल दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी ६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Local service on the downstream road ahead of Wadala, Bhiwala, is closed tomorrow | वडाळा, भायखळ्याच्या पुढे धिम्या मार्गावरील लोकल सेवा उद्या बंद

वडाळा, भायखळ्याच्या पुढे धिम्या मार्गावरील लोकल सेवा उद्या बंद

Next

मुंबई : मध्य रेल्वेच्या मशीद स्थानकातील पादचारी पूल दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी ६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात मशीद स्थानक येथील मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावरील व हार्बरच्या दोन्ही मार्गावरील धिमी वाहतूक सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत पूर्णत: बंद राहील. या कालावधीत मध्य रेल्वेची धिम्या मार्गावरील वाहतूक भायखळा स्थानकापर्यंत व हार्बर मार्गावरील वाहतूक वडाळा रोड स्थानकापर्यंतच सुरू राहील. मध्य व हार्बर मार्गावर याशिवाय कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.

मशीद येथील पादचारी पूल असुरक्षित झाल्याने, त्याच्या दुरुस्तीचे काम मध्य रेल्वे प्रशासनातर्फे हाती घेण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी गर्डर टाकण्यासाठी हा विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटी येथून डाउन धिम्या मार्गावर कल्याणसाठी रविवारी सकाळी १०.१४ वाजता व भायखळा येथून १०.२२ वाजता सुटणारी लोकल शेवटची असेल. याचप्रमाणे, डाउन हार्बर मार्गावर सीएसएमटी येथून पनवेलसाठी सकाळी १०.१० वाजता सुटणारी व वडाळा रोड येथून १०.२८ वाजता सुटणारी लोकल शेवटची असेल, तसेच मध्य रेल्वेच्या अप धिम्या मार्गावर सकाळी ९.५० वाजता सुटणारी शेवटची लोकल असेल. याचप्रमाणे, अप हार्बर मार्गावर सकाळी ९.५२ ला शेवटची लोकल सुटेल. त्यानंतर सलग सहा तासांच्या ब्लॉक काळात मध्य रेल्वेची धिम्या मार्गावरील वाहतूक भायखळा स्थानकापर्यंत व हार्बर मार्गावरील वाहतूक वडाळा रोड स्थानकापर्यंतच सुरू राहील.

ब्लॉक कालावधीत सँडहर्स्ट रोड व मशीद स्थानकात कोणतीही लोकल थांबणार नाही. भायखळा ते सीएसएमटी दरम्यान अप व डाउन धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात येईल. यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान त्रास होणार आहे. मात्र, पूल दुरुस्तीचे महत्त्व लक्षात घेता प्रवाशांनी मध्य रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी केले आहे.

प्रवाशांसाठी विशेष फेऱ्या

प्रवाशांच्या सोयीसाठी वडाळा रोड ते पनवेल आणि वडाळा रोड ते वांद्रे-गोरेगाव या मार्गावर पंधरा मिनिटांनी फेºया चालविण्यात येतील.

वसई, विरार दरम्यान आज मध्यरात्री चार तासांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वेच्या वसई रोड व विरार स्थानकांदरम्यान शनिवारी मध्यरात्री साडेबारा ते रविवारी पहाटे साडेचार वाजेपर्यंत ४ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत डाउन धिम्या मार्गावरील वाहतूक डाउन जलद मार्गावर वळविण्यात येईल. रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेच्या मार्गावर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नसल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

Web Title: Local service on the downstream road ahead of Wadala, Bhiwala, is closed tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :localलोकल