कोसळधार - पुणे, नाशिकमधून येणाऱ्या वाहनांना मुंबईत 'नो एन्ट्री'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 07:55 PM2017-08-29T19:55:48+5:302017-08-30T05:28:31+5:30

पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने मुंबईत पडलेला ताण अधिक वाढू नये म्हणून बाहेरुन येणाऱ्या गाड्यांना बंदी करण्यात आले आहे. 

Kosaladhar - 'No Entry' in Mumbai for vehicles coming from Pune, Nashik | कोसळधार - पुणे, नाशिकमधून येणाऱ्या वाहनांना मुंबईत 'नो एन्ट्री'

कोसळधार - पुणे, नाशिकमधून येणाऱ्या वाहनांना मुंबईत 'नो एन्ट्री'

Next

मुंबई, दि. 29 :  मंगळवारी सकाळपासूनच मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने सखल भागात पाणी साचले आहे. त्यातच रात्री मोठ्या भरतीची व चक्र ीवादळाची शक्यता गृहीत धरून वाहतुकीवर आणि व्यवस्थेवर ताण पडू नये, म्हणून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून मुंबईकडे जाणारी वाहतूक तळेगावातील उर्से टोलनाका व लोणावळ्याजवळील कुसगाव टोलनाका येथे सायंकाळी ६.३०पासून बंद करण्यात आली आहे.
मंगळवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार मंगळवारी रात्री अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यातच समुद्राला भरतीही येणार आहे. मुंबईवर अधिक ताण येऊ नये, यासाठी द्रुतगती मार्गावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्याचा निर्णय उच्चस्तरावर घेण्यात आला; परंतु द्रुतगती मार्गावरून पुण्याकडे जाणारी वाहतूक मात्र सुरू आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूंकडील वाहतूकही सुरू आहे. अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय कोणीही मुंबईत जाऊ नये, तसेच मुंबईकरांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. 

मुंबईसह उपनगरात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या कोसळधारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोसळधार पावसाने मुंबईतील तिन्ही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली.  पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने मुंबईत पडलेला ताण अधिक वाढू नये म्हणून बाहेरुन येणाऱ्या गाड्यांना बंदी करण्यात आले आहे. 
कधीही न थांबणारा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मुंबईतल्या तुफान पावसामुळे बंद करण्यात आला आहे. एक्स्प्रेस वेवरील कुसगाव आणि उर्से टोलनाक्यावर वाहतूक बंद करणार आहेत. महामार्ग पोलिसांकडून मुंबईला जाण्यासाठी मार्ग बंद करण्यात येत आहे.  पावसाने उद्भवलेली परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत मुंबई एण्ट्री पॉईंटवरील टोलवसुली बंद करण्यात आली आहे. सी लिंकवरही टोल घेतला जाणार नाही असे ट्विटट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 

मुंबईवरुन आलेल्या निर्देशानुसार महामार्ग पोलिसांनी मुंबईच्या दिशेचा द्रुतगती मार्ग 6:30 पासून बंद केला. तुफान पावसामुळे मुंबईतील सर्व लोकल मार्ग, रस्ते मार्ग आणि हवाई मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे चहूबाजूंनी मुंबईकरांची कोंडी झाली आहे. त्यातच आता मुंबई- पुणे महामार्गही रोखण्यात आला आहे. मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक कुसगाव, उर्से टोलनाक्याजवळ रोखली जुना हायवे NH 4 ही बंद करण्यात आला आहे.  नाशिककडून मुंबईला येणारी वाहतूक घोटी टोल नाक्याजवळ थांबवली आहे.  वी मुंबईतील सायन झ्र पनवेल हायवे, ठाणे झ्र बेलापूर हायवे, शिळफाटा मार्ग या सर्व ठिकाणी वाहतूक कोंडी आहे.

मुंबईतील पावसाचा जोर वाढत चालला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन घेतला परिस्थितीचा आढावा घेतला आहे. 'मी महापालिका आपतकालीन विभागाशी चर्चा केली असून मुंबई पोलिसांशी हॉटलाईनवरुन बोललो आहे. मंत्रालयातील कर्मचा-यांना लवकरात लवकर कामावरुन घरी जाण्यास सांगण्यात आल्याचं सांगितलं आहे', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांनी अत्यंत गरजेचं असेल तर घराबाहेर पडा असं आवाहन केलं आहे. सोबतच लोकांनी वाहतूक विभागाचा आदेश पाळण्याची विनंतीही केली आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट किंवा फोन केल्यास पोलीस मदतीला धावून येतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

मुंबईला पावसाने सकाळपासून झोडपण्यास सुरुवात केली असून पुन्हा एकदा मुंबईकरांना 26 जुलै 2005 ची आठवण करुन दिली आहे. येत्या २४ तासांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान मुंबई महापालिकेने आपत्कालीन परिस्थिती घोषित केली आहे.

केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, मुंबईच्या पावसाची दिल्लीत पंतप्रधान मोदींकडून दखल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राज्यातील पावसाची दखल घेतली असून ट्विट करत केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे की, 'महाराष्ट्रातील काही भागात पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करेल'.   

Web Title: Kosaladhar - 'No Entry' in Mumbai for vehicles coming from Pune, Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.