कर्नाटकी 'नाटका'वर राज ठाकरेंचं कार्टून; बघाल तर पोट धरून हसाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 12:29 IST2018-05-22T12:04:58+5:302018-05-22T12:29:29+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर खोचक टीका करणारे व्यंगचित्र आपल्या फेसबुक पेजवर शेअर केले आहे.

Karnataka : Raj Thackeray criticises BJP over Karnataka election | कर्नाटकी 'नाटका'वर राज ठाकरेंचं कार्टून; बघाल तर पोट धरून हसाल!

कर्नाटकी 'नाटका'वर राज ठाकरेंचं कार्टून; बघाल तर पोट धरून हसाल!

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर खोचक टीका करणारे व्यंगचित्र आपल्या फेसबुक पेजवर शेअर केले आहे. गेल्या आठवड्याभरापासून कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर भाष्य करणारे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी काढले आहे. या व्यंगचित्रद्वारे राज ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

''घशात हात घालून सत्ता बाहेर काढली'', अशा आशयाचं व्यंगचित्र राज ठाकरे यांनी रेखाटले आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा हात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष अमित शाह यांच्या घशात दाखवण्यात आला आहे. अमित शाह जमिनीवर बसलेले आहेत व राहुल गांधींच्या शेजारी जनता दलाचे (सेक्युलर) नेते एच.डी. कुमारस्वामी उभे असलेले दिसत आहेत.

राज ठाकरे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीही सोशल मीडियावर भाजपावर टीका करणारी पोस्ट केली होती.  ''ईव्हीएमचा विजय असो'', असं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.  

Web Title: Karnataka : Raj Thackeray criticises BJP over Karnataka election