इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा आज मुंबई दौरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 09:29 IST2018-01-18T09:27:27+5:302018-01-18T09:29:46+5:30
मुंबईतील यहुदी समाजाची भेट घेण्यासह बॉलिवूडला जवळून पाहण्यासाठी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहून गुरुवारी (18 जानेवारी) मुंबई दौ-यावर आहेत.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा आज मुंबई दौरा
मुंबई - मुंबईतील यहुदी समाजाची भेट घेण्यासह बॉलिवूडला जवळून पाहण्यासाठी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहून गुरुवारी (18 जानेवारी) मुंबई दौ-यावर आहेत. गुजरात दौरा बुधवारी (17 जानेवारी) पूर्ण केल्यानंतर, संध्याकाळी ते मुंबईला पोहोचले. मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचे मराठमोळ्या पद्धतीत स्वागत करण्यात आले.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील एक ठिकाण असलेल्या नरिमन हाऊस येथील छाबड सेंटरलाही नेतान्याहू भेट देणार आहेत. हॉटेल ताजमध्ये यहुदी समाजाच्या काही प्रतिष्ठित लोकांना भेटून, त्यांच्यासोबत ते 26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी छाबड सेंटरला भेट देतील. तिथे ते मोशे होल्ट्जबर्गला भेटणार आहेत. यावेळी छाबड सेंटरमध्ये उभारलेल्या संग्रहालयाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
दरम्यान, मुंबईतील बॉलिवूड नगर पत्नीसह पाहण्याची इच्छा त्यांनी आधीच व्यक्त केली आहे. त्याप्रमाणे शालोम बॉलिवूड या कार्यक्रमात सामील होणार आहेत. यहुदी समाजासोबतच देशातील प्रमुख उद्योगपतींनाही नेतान्याहून भेटणार आहेत. त्याप्रमाणे ते विविध ठिकाणांना भेट देण्याची शक्यता आहे. नेतान्याहू यांच्या भोजनाची व्यवस्था खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती समोर आली आहे.
#Mumbai Israel Prime Minister Benjamin Netanyahu to take part in Indian CEOs business seminar, lay wreath at Taj Hotel, visit Nariman House and attend Shalom Bollywood event (File Pic) pic.twitter.com/lXVLAWNFDn
— ANI (@ANI) January 18, 2018
Israel PM #BenjaminNetanyahu and his wife Sara Netanyahu arrived in Mumbai, received by Chief Minister Devendra Fadnavis #NetanyahuInIndiapic.twitter.com/qL0BUkTYac
— ANI (@ANI) January 17, 2018