गणेशोत्सव काळात पुरोहितांना वाढती मागणी, गणेशभक्तांकडून पुरोहितांचे बुकिंग आधीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 04:27 AM2017-08-23T04:27:31+5:302017-08-23T04:28:12+5:30

गणपती उत्सवात गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करताना पूजा, गणेश याग, गण होम असे धार्मिक कार्यक्रम केले जातात. त्यामुळे सध्या पुरोहितांची मागणी वाढली असून, शहरातील कित्येक पुरोहितांचे अकरा दिवसांचे बुकिंग गणेशभक्तांनी अगोदरच करून ठेवले आहे.

Increasing demand for priests during Ganeshotsav, booking of Purohita with Ganesh devotees already | गणेशोत्सव काळात पुरोहितांना वाढती मागणी, गणेशभक्तांकडून पुरोहितांचे बुकिंग आधीच

गणेशोत्सव काळात पुरोहितांना वाढती मागणी, गणेशभक्तांकडून पुरोहितांचे बुकिंग आधीच

googlenewsNext

- अक्षय चोरगे ।

मुंबई : गणपती उत्सवात गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करताना पूजा, गणेश याग, गण होम असे धार्मिक कार्यक्रम केले जातात. त्यामुळे सध्या पुरोहितांची मागणी वाढली असून, शहरातील कित्येक पुरोहितांचे अकरा दिवसांचे बुकिंग गणेशभक्तांनी अगोदरच करून ठेवले आहे.
सध्या पौरोहित्य करत असणा-यांपैकी बहुतेकांची मुले उच्च शिक्षण घेत आहेत. त्यामुळे अशा गुरुजींची पुढची पिढी या क्षेत्रात येत नाही. शिवाय मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या आणि घरगुती गणपती असणा-या गणेशभक्तांची संख्याही वाढत असल्यामुळे गणेशोत्सव काळात पुरोहितांची कमतरता भासते, असे गणेशोत्सव समितीचे कार्याध्यक्ष कुंदन अगासकर यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून शहरात पूजेसाठी पुरोहितांच्या कमतरतची समस्या जाणवत होती. या समस्येवर उपाय म्हणून तीन वर्षांपूर्वी गणेशोत्सव समन्वय समितीने काळाचौकी येथील कार्यालयात कार्यशाळा घेतली होती. गणेशोत्सव समन्यव समितीचे आणि संबंधितांचे यासंदर्भात कौतुक झाले, अशी माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी दिली.

गणेशोत्सव काळात पुरोहितांना मोठी मागणी असते. कामाचा खूप व्यापही असतो. या काळात पुरोहितांना पूजेच्या कामातून उसंत मिळणेही कठीण असते, हे खरे आहे. पण शहरात पुरोहितांची संख्या कमी आहे, असे म्हणता येणार नाही. याउलट या क्षेत्राकडे येण्यासाठी अनेक तरुण उत्साही आहेत. सायन येथे पौरोहित्य शिकविण्यासाठी इच्छुकांची कार्यशाळा घेण्यात येते. दरवर्षी तेथे प्रवेश फुल्ल होऊन प्रवेश प्रक्रिया थांबवावी लागते. एवढ्या मोठ्या संख्येने तरुण या क्षेत्राकडे वळत आहेत.
- श्रीराम सप्रे, पुरोहित

Web Title: Increasing demand for priests during Ganeshotsav, booking of Purohita with Ganesh devotees already

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.