कुलाब्यातील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये परवडणा-या घरांवर विचारमंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 02:20 AM2017-11-23T02:20:55+5:302017-11-23T02:21:06+5:30

मुंबई : कुलाब्यातील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये मंगळवारी ‘परवडणारी घरे, राहण्यायोग्य शहरे’ या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

Ideas on affordable homes at World Trade Center in Colaba | कुलाब्यातील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये परवडणा-या घरांवर विचारमंथन

कुलाब्यातील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये परवडणा-या घरांवर विचारमंथन

Next

मुंबई : कुलाब्यातील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये मंगळवारी ‘परवडणारी घरे, राहण्यायोग्य शहरे’ या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत खासगी भांडवल, वित्तीय संस्था, बांधकाम उद्योजक, विकासक, रचनाकार आणि धोरणकर्ते अशा विविध घटकांतील मान्यवरांनी एकाच व्यासपीठावर येत विचारमंथन केले.
बांधकाम, वित्त, रचना अशा विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी एकत्र येत, ‘सर्वांसाठी घर’ या शासकीय उपक्रमावर विचारविनिमय केले.
स्टेट बँक आॅफ इंडियाच्या माजी अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी अध्यक्षीय भाषणात परवडणाºया घरांच्या संकल्पनेवर आपले मत
आणि विचार मांडले. राज्य शासनातर्फे गृहनिर्माण विभागाचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी शासनाच्या धोरणांवर प्रकाश टाकला, तर
केंद्र शासनातर्फे नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अर्बन अफेयर्सचे संचालक जगन शाह यांनी चर्चेत सहभाग नोंदविला.
शहरी विकासात योग्य किमतीच्या घरांची उपलब्धता हा सर्वांत मोठा घटक आहे. सर्वांसाठी २०२२ सालापर्यंत परवडणारी घरे उभारणे अवघड असले, तरी एकत्रित येऊन हा प्रश्न सोडविण्याचा निश्चय या वेळी व्यक्त करण्यात आला. त्यासाठी धोरणाचा सर्व बाजूंनी विचार करावा लागेल. शासकीय नियम सुधारणे, व्यावसायिक भागीदारांची कार्यक्षमता वाढविणे, पुरेसे भांडवल उपलब्ध करून देणे आणि तळापासून वर सामाजिक सहभाग वाढविणे या बाबींवर लक्ष केंद्रित करावे लागेल. परवडणारी घरे उभारताना शहरातील सार्वजनिक वाहतूक, रोजगार आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी समरसता उपलब्ध करून देण्याकडे लक्ष देण्याचा एकमुखी सूर परिषदेत व्यक्त करण्यात आला.
>या परिषदेतील चर्चेमध्ये रोटरडॅममधील अलेक्झांडर जॅकनाऊ, रोटरडॅमचे उपमहापौर मार्टेन स्ट्रईज्वेनबर्ग, इंडोनेशियातील आंद्रेया फित्रीयांतो अशा विविध आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ मान्यवरांनी सहभाग घेतला.

Web Title: Ideas on affordable homes at World Trade Center in Colaba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.