हॉलतिकीट ३ फेब्रुवारीपर्यंत

By admin | Published: January 31, 2017 02:05 AM2017-01-31T02:05:40+5:302017-01-31T02:05:40+5:30

फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांकरिता शिक्षण मंडळ सज्ज झाले आहे. बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारी ते २५ मार्चदरम्यान होणार आहे, तर दहावीची

Holtikit 3 February | हॉलतिकीट ३ फेब्रुवारीपर्यंत

हॉलतिकीट ३ फेब्रुवारीपर्यंत

Next

नवी मुंबई : फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांकरिता शिक्षण मंडळ सज्ज झाले आहे. बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारी ते २५ मार्चदरम्यान होणार आहे, तर दहावीची परीक्षा ७ मार्च ते १ एप्रिलदरम्यान होणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी ३ लाख ८८ हजार विद्यार्थ्यांनी बोर्डाकडे अर्ज सादर केले आहेत, तर बारावीच्या परीक्षेकरिता ३ लाख ३८ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने संकेतस्थळावर परीक्षेविषयीची सर्व माहिती दिली आहे. यापूर्वी २९ आॅक्टोबर २०१६ रोजी दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले होते. त्यावर हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार, प्राप्त झालेल्या हरकती, सूचनांप्रमाणे दहावीच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यात आले आहेत, तर बारावीच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नुकत्याच झालेल्या बैठकीत केंद्रनिश्चिती झाल्याची माहिती बोर्डाचे सहसचिव डॉ.सुभाष बोरसे यांनी दिली. ८ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारीदरम्यान बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Holtikit 3 February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.