जेट एअरवेजच्या ग्राउंड स्टाफचे आंदोलन; वेळेत वेतन होत नसल्याचा केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 04:48 AM2019-04-13T04:48:29+5:302019-04-13T04:48:40+5:30

कर्मचाऱ्यांनी टी २ येथून जेटच्या कार्यालयावर मोर्चा काढला.

Ground staff movement of Jet Airways; The prohibition of not being paid in time | जेट एअरवेजच्या ग्राउंड स्टाफचे आंदोलन; वेळेत वेतन होत नसल्याचा केला निषेध

जेट एअरवेजच्या ग्राउंड स्टाफचे आंदोलन; वेळेत वेतन होत नसल्याचा केला निषेध

मुंबई : जेट एअरवेजमधील सुरूअसलेल्या आर्थिक संकटामुळे वेळेवर वेतन होत नसल्याने, जेटच्या ग्राउंड स्टाफने शुक्रवारी दुपारी टर्मिनल २ येथून जेटच्या कार्यालयावर मोर्चा काढला. व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी, तसेच व्यवस्थापनाला इशारा देण्यासाठी आॅल इंडिया जेट एअरवेज आॅफिसर्स अँड स्टाफ असोसिएशनतर्फे हे आंदोलन केले.


असोसिएशनचे अध्यक्ष आमदार किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी टी २ येथून जेटच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी उपाध्यक्ष चैतन्य माईनकर व पदाधिकारी उपस्थित होते. द्वारसभेत पावसकर यांनी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. वेतनासाठी पैसे मिळण्याबाबत एसबीआयशी संपर्क साधत असून, पैसे मिळाल्यानंतर सर्वप्रथम ग्राउंड स्टाफचे वेतन देऊ, अशी ग्वाही मिळाल्याचे पावसकर म्हणाले. जेटच्या ढासळत्या स्थितीबाबत केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री, हवाई वाहतूक मंत्रालय व पंतप्रधानांनी त्वरित दखल घेऊन कार्यवाही करण्याची गरज होती. मात्र, ती न झाल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त केला.

प्रवाशांचे हाल : २५ वर्षे पूर्ण झालेल्या जेट एअरवेजच्या ताफ्यात ११९ विमाने होती. मात्र, शुक्रवारी ही संख्या अवघ्या १० विमानांवर आल्याने कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. विमानांना इंधन पुरवठा होत नसल्याने अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. उड्डाणे रद्द करण्यात आल्याने व आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित करण्यात आल्याने, जेटने प्रवास करणाºया प्रवाशांनादेखील फटका बसला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये जेटच्या प्रशासनाविरोधात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. विमान प्रवास करताना जास्त दिवस अगोदर आरक्षण केल्यास कमी तिकीट दर असतो. त्यामुळे अनेकांनी याचा लाभ घेण्यासाठी दोन ते तीन महिने आगावू आरक्षण केले होते. मात्र, उन्हाळी सुट्टी सुरू होतानाच, जेटची सेवा कोलमडल्याने त्याचा मोठा फटका अशा प्रवाशांना बसला आहे. देशांतर्गत विमानांची उड्डाणेदेखील अत्यल्प प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये कंपनीबाबत संतप्त भावना आहे.

कार्यवाहीचे निर्देश
नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड या जेट एअरवेजच्या वैमानिकांच्या संघटनेने कंपनीला यापूर्वीच पत्र पाठवून १४ एप्रिलपर्यंत थकीत वेतन द्यावे, अशी मागणी केली आहे. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, हवाई वाहतूक सचिवांना या प्रकरणी लक्ष घालून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Ground staff movement of Jet Airways; The prohibition of not being paid in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.