जाहिरातबाजीवर केंद्र सरकारने खर्च केले ४ हजार ३४३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 05:57 AM2018-05-15T05:57:06+5:302018-05-15T05:57:06+5:30

केंद्र सरकारने मागील ४६ महिन्यांत सर्व प्रकाराच्या जाहिरातींवर ४ हजार ३४३.२६ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

The government spent 4 thousand 343 crore on advertising | जाहिरातबाजीवर केंद्र सरकारने खर्च केले ४ हजार ३४३ कोटी

जाहिरातबाजीवर केंद्र सरकारने खर्च केले ४ हजार ३४३ कोटी

Next

मुंबई : केंद्र सरकारने मागील ४६ महिन्यांत सर्व प्रकाराच्या जाहिरातींवर ४ हजार ३४३.२६ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकारान्वये प्राप्त कागदपत्रांतून या खर्चाची माहिती समोर आणली आहे. केंद्र सरकारच्या ब्युरो आॅफ आऊटरिच अ‍ॅण्ड कम्युनिकेशन डिपार्टमेंटने ही माहिती गलगली यांना दिली आहे.
केंद्र सरकारच्या ब्युरो आॅफ आऊटरिच अ‍ॅण्ड कम्युनिकेशन डिपार्टमेंटचे वित्तीय सल्लागार तपन सूत्रधर यांनी गलगली यांना १ जून २०१४पासूनची माहिती दिली आहे. यामध्ये १ जून २०१४पासून ३१ मार्च २०१५दरम्यान ४२४.८५ कोटी प्रिंट मीडियासाठी, ४४८.९७ कोटी इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी आणि ७९.७२ कोटी रुपये बाह्य प्रचारावर खर्च करण्यात आले आहेत. २०१५-१६ या वर्षात ५१०.६९ कोटी प्रिंट मीडिया, ५४१.९९ कोटी इलेक्ट्रॉनिक मीडिया, ११८.४३ कोटी बाह्य प्रचारावर खर्च करण्यात आले आहेत. २०१६-१७ या वर्षात ४६३.३८ कोटी प्रिंट मीडिया, ६१३.७८ कोटी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि १८५.९९ कोटी बाह्य प्रचारावर खर्च करण्यात आले आहेत. १ एप्रिल २०१७ ते ७ डिसेंबर २०१८दरम्यान ३३३.२३ कोटी प्रिंट मीडियावर खर्च करण्यात आले आहेत. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ दरम्यान इलेक्ट्रॉनिक मीडियावर ४७५.१३ कोटी खर्च करण्यात आले आहेत. १ एप्रिल २०१७ ते ३१ जानेवारी २०१८ दरम्यान १४७.१० कोटी बाह्य प्रचारावर खर्च करण्यात आले आहेत.
>खर्च ३०८ कोटींनी कमी
२०१६-१७ या आर्थिक वर्षात एकूण १ हजार २६३.१५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. २०१७-१८ वर्षांत ९५५.४६ कोटी रुपये खर्च करण्यात आले.
२०१७च्या तुलनेत २०१८ साली खर्चात कपात करण्यात आली.
हा खर्च ३०८ कोटी रुपयांनी
कमी करण्यात आला.

Web Title: The government spent 4 thousand 343 crore on advertising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.