#GoodBye2017: प्रवाशांना रेल्वेचे ‘गुडबाय गिफ्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 04:50 AM2017-12-28T04:50:42+5:302017-12-28T07:07:51+5:30

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी घराबाहेर पडणाºया जनतेसाठी रेल्वे प्रशासनाने ‘गुडबाय गिफ्ट’ दिले आहे. नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी प्रवाशांच्या मागणीसाठी पश्चिम रेल्वेने ८ आणि मध्य रेल्वेने ४ विशेष फे-या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

# GoodBye2017: Train's Goodbye Gift | #GoodBye2017: प्रवाशांना रेल्वेचे ‘गुडबाय गिफ्ट’

#GoodBye2017: प्रवाशांना रेल्वेचे ‘गुडबाय गिफ्ट’

Next

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी घराबाहेर पडणाºया जनतेसाठी रेल्वे प्रशासनाने ‘गुडबाय गिफ्ट’ दिले आहे. नवीन वर्षाचा
आनंद साजरा करण्यासाठी प्रवाशांच्या मागणीसाठी पश्चिम रेल्वेने ८ आणि मध्य रेल्वेने ४ विशेष फे-या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम रेल्वेची विशेष (१) चर्चगेट-विरार ही लोकल चर्चगेट येथून रात्री १ वाजून १५ मिनिटांनी निघेल. रात्री २ वाजून ५५ मिनिटांनी विरार येथे पोहोचेल. विशेष लोकल (२) विरार-चर्चगेट विरार येथून १२ वाजून १५ मिनिटांनी सुटणार असून, चर्चगेटला १ वाजून ४७ मिनिटांनी पोहोचणार आहे. विशेष लोकल (३) चर्चगेट येथून रात्री २ वाजता निघणार असून, विरारला पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे. विशेष लोकल (४) विरार येथून रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार असून, चर्चगेटला रात्री २ वाजून १७ मिनिटांनी पोहोचेल. विशेष लोकल (५) चर्चगेट येथून रात्री २ वाजून ३० मिनिटांनी सुटणारी लोकल पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी विरार येथे पोहोचेल. विशेष लोकल (६) विरार येथून १ वाजून ४० मिनिटांनी सुटणार असून, चर्चगेटला रात्री ३ वाजून १२ मिनिटांनी पोहोचेल. विशेष लोकल (७) चर्चगेटवरून रात्री ३ वाजून २५ मिनिटांनी सुटणार असून, विरारला पहाटे ५ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल. विशेष लोकल (८) विरार येथून रात्री ३ वाजून ५ मिनिटांनी सुटणार असून, चर्चगेटला पहाटे ४.३७ मिनिटांनी पोहोचणार आहे.
>मध्य रेल्वेच्या विशेष लोकल
लोकल मार्ग                                    वेळ
सीएसएमटी-कल्याण (डाउन) मध्यरात्री ०१.३० - मध्यरात्री ३.००
कल्याण-सीएसएमटी (अप) मध्यरात्री ०१.३० - मध्यरात्री ३.००
हार्बर मार्ग
सीएसएमटी-पनवेल (डाउन) मध्यरात्री ०१.३० - मध्यरात्री २.५०
पनवेल-सीएसएमटी (अप) मध्यरात्री ०१.३० - मध्यरात्री २.५०

Web Title: # GoodBye2017: Train's Goodbye Gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.