घोसाळकरांचा ठाम नकार... उत्तर मुंबईत लढलो, तर ठाकरेंकडूनच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 07:19 AM2024-04-10T07:19:32+5:302024-04-10T07:20:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : इंडिया आघाडीच्या अंतिम जागावाटपात अखेर उत्तर मुंबईची जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. मात्र आपले ...

Ghosalkar's firm refusal... if we fight in north Mumbai, then from Thackeray | घोसाळकरांचा ठाम नकार... उत्तर मुंबईत लढलो, तर ठाकरेंकडूनच

घोसाळकरांचा ठाम नकार... उत्तर मुंबईत लढलो, तर ठाकरेंकडूनच

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इंडिया आघाडीच्या अंतिम जागावाटपात अखेर उत्तर मुंबईची जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. मात्र आपले स्थानिक संघटन दुबळे असल्याचे काँग्रेसला माहिती असल्याने आपल्याला त्यांच्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र उत्तर मुंबईतून लढलो तर ठाकरेंकडूनच लढू, असा पवित्रा माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी घेतला आहे.

मुंबईतील चार जागांवर उद्धवसेनेकडून आधीच उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येईल, याबाबत आधीच अटकळ बांधण्यात येत होती. मुळात हा मतदारसंघ काँग्रेससाठी कायम अडचणीचा राहिला आहे. याला अपवाद २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीचा. त्या वेळी अभिनेता गोविंदाची उमेदवारी आणि मनसे फॅक्टर यामुळे हा मतदारसंघ कसाबसा काँग्रेसच्या हाताला लागला.
आताही इथून लढण्यास काँग्रेसचे पदाधिकारी फारसे इच्छुक नाहीत. महाविकास आघाडीकडून येथून कोणता पक्ष लढणार हे निश्चित झालेले नव्हते. मात्र घोसाळकर यांनी कार्यकर्ते, मतदारांच्या गाठीभेठी सुरू केल्या होत्या मात्र मंगळवारी हा मतदार संघ काँग्रेसला सोडण्यात आला.

...तर स्वबळावर लढा
उत्तर मुंबईत काँग्रेसकडे संघटन वा नेतृत्व नाही. भाजपला तडीपार करायचे असेल तर काँग्रेसने येथे आपली ताकद नाही, हे मान्य करून ही जागा सेनेला द्यावी. काँग्रेसला उत्तर मुंबईविषयी आत्मविश्वास असेल तर स्वत:च्या बळावर लढण्याची तयारी ठेवावी.
- विनोद घोसाळकर, नेते, उद्धवसेना

Web Title: Ghosalkar's firm refusal... if we fight in north Mumbai, then from Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.