'पालिका रुग्णालयांत जेनेरिक औषधे सुरू करा',

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 03:11 AM2018-04-21T03:11:05+5:302018-04-21T03:11:05+5:30

जेनेरिक औषधे ही रुग्णांना फायदेशीर असतात. इंडियन मेडिकल काउन्सिलने मॉडेल प्रिस्क्रिप्शन कायद्यांतर्गत डॉक्टरांना त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना जेनेरिक औषधच लिहून देण्याचे आदेश दिले आहेत.

 'Generic generic medicines in municipal hospitals',' | 'पालिका रुग्णालयांत जेनेरिक औषधे सुरू करा',

'पालिका रुग्णालयांत जेनेरिक औषधे सुरू करा',

googlenewsNext

मुंबई : जेनेरिक औषधे ही रुग्णांना फायदेशीर असतात. इंडियन मेडिकल काउन्सिलने मॉडेल प्रिस्क्रिप्शन कायद्यांतर्गत डॉक्टरांना त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना जेनेरिक औषधच लिहून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच आता भाजपाच्या नगरसेविकेने पालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांनी जेनेरिक औषधे लिहून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पालिकेच्या केईएम, नायर, शीव, कूपर रुग्णालयांत उपचारासाठी येणाºया रुग्णांची आर्थिक स्थिती बेताची असते. अशा वेळी ब्रॅण्डेड औषधांचा खर्च त्यांना परवडण्याजोगा नसतो. त्यामुळे पालिकेची मुख्य रुग्णालये, उपनगरीय रुग्णालय, आरोग्य केंद्र आणि दवाखान्यात उपचारांसाठी येणाºया रुग्णांना डॉक्टरांनी ब्रॅण्डेड औषधांऐवजी जेनेरिक औषधे लिहून द्यावीत, अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका संगीता शर्मा यांनी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. यासंदर्भात शर्मा म्हणाल्या की, पालिकेच्या रुग्णालयात येणाºया गरीब रुग्णांना उपलब्ध असलेली औषधे विनामूल्य दिली जातात. जी औषधे उपलब्ध नसतात ती बाहेरून घ्यायला सांगतात. बाहेरील ब्रॅण्डेड कंपन्यांची औषधे महाग असल्याने रुग्णांना परवडण्यासारखी नसतात. म्हणून पालिका रुग्णालयातील रुग्णांना ब्रॅण्डेड औषध कंपन्यांच्या नावाऐवजी केवळ जेनेरिक औषधे लिहून द्यावीत, अशी ठरावाची सूचना होती. स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात येणार असून यावर चर्चेनंतर निर्णय होईल.

Web Title:  'Generic generic medicines in municipal hospitals','

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.