फुकट्या प्रवाशांना एसीमध्येही फुटला घाम; ६० हजार जणांकडून १७३ कोटींची दंड वसूली

By सचिन लुंगसे | Published: April 8, 2024 05:51 PM2024-04-08T17:51:42+5:302024-04-08T17:58:45+5:30

एसी लोकलमधून फुकट प्रवास करणा-या प्रवाशांवरही कारवाई केली जात असून, या दंडाच्या रक्कमेच्या वसूलीत २५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

free passengers in ac local 173 crore rs fine will be collected by western railway in mumbai | फुकट्या प्रवाशांना एसीमध्येही फुटला घाम; ६० हजार जणांकडून १७३ कोटींची दंड वसूली

फुकट्या प्रवाशांना एसीमध्येही फुटला घाम; ६० हजार जणांकडून १७३ कोटींची दंड वसूली

सचिन लुंगसे, मुंबई : लोकलमधून फुकट प्रवासाचा आनंद घेणा-या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात असून, एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या दरम्यान फुकटया प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने १७३ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. तर एसी लोकलमधून फुकट प्रवास करणा-या प्रवाशांवरही कारवाई केली जात असून, या दंडाच्या रक्कमेच्या वसूलीत २५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

एसी लोकलमधील फुकटया प्रवाशांवर अंकुश ठेवण्यासाठी नियमित तिकिट तपासणी मोहीम हाती घेतली जात आहे. याद्वारे एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान ६० हजार फुकटया प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, यातून २०० लाख रुपये दंडात्मक रक्कमेची वसूल झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी या रक्कमेत २५ टक्के वाढ झाली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलसह मेल, एक्सप्रेसमधील प्रामाणिक रेल्वे प्रवाशांना फुकटया प्रवाशांचा त्रास होत असून, विनातिकिट प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे, यासंदर्भात पश्चिम रेल्वेकडून सातत्याने जनजागृती केली जात आहे.  आता केवळ जनजागृती नाही तर तिकिट तपासणी मोहीमेला वेग आला असून, पॅसेंजरसह हॉली डे स्पेशल गाड्यांमधील तपासणी वेगाने केली जात आहे. फुकटया प्रवाशांवर अंकुश बसावा म्हणून कारवाईत सातत्य ठेवले जात आहे. त्यानुसार, फुकटया प्रवाशांवर करण्यात आलेल्या कारवाईतून १७३.८९ कोटी रुपये दंडात्मक वसूली झाली आहे. यात मुंबई उपनगरीय लोकलमधून प्राप्त दंडात्मक वसूलीची रक्कम ४६.९० कोटी रुपये आहे.

मार्च महिन्यात साहित्यासह विनातिकिट प्रवास करणा-या सुमारे २.७५ लाख प्रवाशांकडून १६.७७ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. मार्च महिन्यात १ लाखांहून अधिक प्रकरणांचा छडा लावत ४.८० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.

लोकलने रात्री फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी पश्चिम रेल्वे बॅटमॅन नावाच्या टिम तैनात केल्या आहेत. या टीम नियमित तपासण्या करत नाहीत मात्र ऐनवेळी मोहीमेला वेग देत फुकटया प्रवाशांना धडा शिकवितात. विशेषत: फर्स्ट क्लासमधून प्रवाशांवर बॅटमॅनची करडी नजर असते. बॅटमॅनची संकल्पना प्रवाशांनाची सुचवली असून, त्यानुसार या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तिकिट तपासतेवेळी संशयास्पद हालचालींवर टीमकडून लक्ष ठेवले जाते. 

Web Title: free passengers in ac local 173 crore rs fine will be collected by western railway in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.